अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 06:00 PM2020-09-04T18:00:24+5:302020-09-04T18:00:54+5:30

लाखों दिलों की धडकन बनलेला रणवीर सिंहला अभिनेता बनण्याची खरी प्रेरणाही खिलाडी अक्षय कुमारकडूनच मिळाली दिसते. तो अक्षय कुमारचा जबरदस्त फॅन आहे.

Not just fans but even Ranveer Singh loves the Khiladi Akshay Kumar | अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला?

अक्षय कुमारसह दिसणारा 'हा' चिमुरडा आज आहे बॉलीवूडचा स्टार कलाकार, ओळखले का तुम्ही त्याला?

googlenewsNext


सध्या चित्रपटसृष्टीत अभिनेता रणवीर सिंहची भलतीच क्रेझ आहे. तो जे काही करतो ते थोडे अतरंगी वाटत असले तरी भन्नाट असते. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची लोकप्रियताही वाढत आहे. लाखों दिलों की धडकन बनलेला रणवीर सिंहला अभिनेता बनण्याची खरी प्रेरणाही खिलाडी अक्षय कुमारकडूनच मिळाली दिसते.  तो अक्षय कुमारचा जबरदस्त फॅन आहे. म्हणूनच बालपणी अक्षयला पाहताच त्याच्यासह फोटो क्लिक करत त्यांने तो क्षण कॅमे-यात कैद केला. 

आज रणवीर सिंहचे लाखो फॅन असले तरी तो अक्षय कुमारचा मोठा फॅन असल्याचे या फोटोमुळे स्पष्ट होते. फोटोत अक्षय कुमारसह दिसणारा चिमुरड्याला पाहून हा रणवीर सिंह असल्याचे वाटत नाही. या बालपणीच्या फोटोतील रणवीरचा अंदाज त्याच्या फॅन्सना चांगलाच भावतो आहे.  त्याची हेअर स्टाइल देखील अगदी वेगळी आहे. बालपणापासूनच रणवीरला अशा हटके गोष्टी करायला आवडतात हे यावरून दिसते. अक्षय कुमारसह फॅन मोमेंट कॅमे-यात कैद करणारा रणवीरने आज बड्या बड्या स्टार्ससह रुपेरी पडदा गाजवला आहे. 

आपल्या भूमिकांसोबतच रणवीर त्याच्या हटके स्टाईलमुळे रसिकांचं लक्ष वेधून घेतो. त्याची हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाईल कायमच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.

 

शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी रणवीर आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंगने रसिकांची मनं जिंकतो. त्यामुळेच की काय नेहमीच  सोशल मीडियावर शेअर केलेले त्याचे फोटो रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात.

Web Title: Not just fans but even Ranveer Singh loves the Khiladi Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.