रणवीर सिंगची त्याच्या मित्रांशी असलेली जवळीक हे तर जगजाहीर आहे. त्यांना तो भेटण्यासाठी नेहमीच वेळ काढतो. पुन्हा एकदा त्याच्या मैत्रीचा किस्सा समोर आला आहे. रणवीर आणि डिझायनर सिमॉन खंबाटा वयाच्या 11 व्या वर्षापासून मित्र आहेत. त्यांनी एकत्र अनेक सहली केल्या आहेत. सिमॉन ही रणवीरच्या खूप चांगली मित्रांपैकी एक असून दोघे एकत्र लहानाचे मोठे झाले. 


सिमॉन ही ब्रायडल डिझायनर म्हणून प्रख्यात आहे, तसेच तिचे मेन्सवेअर देखील हटके असतात. रणवीरच्या नावापुढे सुपरस्टार हे बिरुद लागल्यापासून तो कायमच सिनेमांचे चित्रीकरण किंवा एंडोर्समेंटकरिता मुंबईत येऊन-जाऊन असतो. सिमॉन तिचे दोन दिवसीय वेडिंग (लक्झरी) एक्झिबिशन सादर करणार त्यादिवशी आपण मुंबईतच असू याची जाणीव रणवीरला झाली. त्याने तातडीने संपूर्ण दिवस मोकळा ठेवण्याविषयीची सूचना आपल्या टीमला केली. जेणेकरून त्याला सिमॉनसाठी रॅम्पवॉक करता येईल व आपल्या जिवलग मैत्रिणीला पाठींबा दर्शवता येईल. त्याला आपल्या मैत्रिणीच्या खास दिवशी त्याठिकाणी उपस्थित राहायचे होते,” अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते.


सिमॉन म्हणते, “रणवीर आणि मी गेली अनेक वर्षे एकत्र आहोत आणि आमची मैत्री बऱ्याच कसोट्यांमधून गेली आहे. मात्र ती काळासोबत अधिक घट्ट आणि बळकट होत राहिली. त्याच्यात एक स्टार दडलाय हे मला कायमच माहिती होते. लहानपणी त्याच्या वाढदिवशी जेव्हा तो गोविंदाच्या गाण्यावर नाचायचा तेव्हा ते  जाणवायचे. रणवीर सरप्राईज देण्यात पटाईत आहे. त्याने माझ्याकरिता रॅम्पवॉक करायचे निश्चित केले आणि एक शो-स्टॉपर म्हणून त्याने माझ्याकरिता जे केले, ते त्याचे जेश्चर गोडच आहे. ते मला खरोखर भावले.”

 

रणवीर म्हणतो, “एक डिझायनर म्हणून सिमॉनकडे एक अनन्य सर्जनशील अभिव्यक्ती आहे. ती लहानपणापासून माझी जिवलग मैत्रीण आहे. मला तिला पाठींबा द्यायचा होता आणि फॅशन जगतातील तिचा यशस्वी क्षण साजरा करायचा होता. आम्ही एकत्र वाढल्याने, जपून ठेवलेल्या अशा अनेक समृद्ध स्मृती आहेत. तिने बजावलेल्या कामगिरीत माझा खारीचा सहभाग असल्याचा मला अभिमान वाटतो. तिचा कार्यक्रम धमाल होणार आणि मी त्यासाठी उत्सुक आहे.”   

 


Web Title: Not For Deepika Padukone But For this Person'Ranveer Singh did this work, Read details
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.