nora fatehi wants to marry with taimur know kareena kapoor reaction | काय सांगता? तैमूरला चक्क  स्थळ आलं...! बेबो करिना कपूरही झाली शॉक्ड!!

काय सांगता? तैमूरला चक्क  स्थळ आलं...! बेबो करिना कपूरही झाली शॉक्ड!!

ठळक मुद्देनोराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे ती गुरु रंधावाच्या ‘नाच मेरी रानी’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.

सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमूर अली खानचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा करतेय कोण? आता तर तैमूरला लग्नाच्या ऑफरही येऊ लागल्या आहेत. बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही हिने तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

होय, नोरा अलीकडे तैमूरची मम्मी करिना कपूर हिच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये सहभागी झाली. यावेळी  करिनासमोरच नोराने ही इच्छा व्यक्त केली. तैमूर तुझ्या डान्स मुव्हचा दिवाना आहे, असे करिनाने नोराला सांगितले. यावर नोराने थेट तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘तैमूर लवकर मोठा होईल, अशी आशा करते. तो मोठा झाला की मी त्याच्यासोबत साखरपुडा व नंतर लग्नाबद्दल विचार करू शकते,’असे नोरा म्हणाली. नोराचे हे शब्द ऐकून करिनाला हसू आवरले नाही. तैमूर आता फक्त 4 वर्षांचा आहे, त्याच्या लग्नाला आता बराच वेळ आहे, असे ती हसत हसत म्हणाली. यावर ‘काही हरकत नाही, मी वाट पाहीन,’ असे नोरा म्हणाली. आता नोराची ही इच्छा पूर्ण होते की नाही बघूच.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे ती गुरु रंधावाच्या ‘नाच मेरी रानी’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. हा व्हिडीओ रिलज होताच, काही तासात याला हजारो व्ह्युज मिळाले होते. आत्तापर्यंत 300 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. लवकरच ती ‘भुज’ या सिनेमात दिसणार आहे.

VIDEO: नोरा फतेहीच्या ट्रान्सपरंट गाऊनने इंटरनेटवर माजवली खळबळ, पहा हा व्हिडीओ

IN PICS : ‘बेगम’ करिना कपूर खान आहे इतक्या कोटींची मालकीण, छोट्याशा बॅगसाठी मोजते इतके पैसे

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: nora fatehi wants to marry with taimur know kareena kapoor reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.