नोरा फतेहीच्या डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर लावली 'आग', जबरदस्त मुव्ह्स पाहून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 12:15 PM2021-07-01T12:15:46+5:302021-07-01T12:15:53+5:30

Nora Fatehi Dance : या व्हायरल व्हिडीओत नोरा फतेही बिकीनी टॉप आणि शॉर्ट्स घालून डान्स करताना दिसत आहे. हॉलिवूड गायक ड्रेकच्या 'वन डान्स' गाण्यावर जबरदस्त मुव्ह्स करताना दिसत आहे.

Nora Fatehi shows sexy dance moves shares summer time vibe video watch | नोरा फतेहीच्या डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर लावली 'आग', जबरदस्त मुव्ह्स पाहून चाहते घायाळ

नोरा फतेहीच्या डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर लावली 'आग', जबरदस्त मुव्ह्स पाहून चाहते घायाळ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. नोरा अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरही आहे. आपले डान्सचे व्हिडीओ शेअर करत ती तिच्या फॅन्सचं मनोरंजनही करते. आता तिने नुकताच एक डान्सचा धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे. 

या व्हायरल व्हिडीओत नोरा फतेही बिकीनी टॉप आणि शॉर्ट्स घालून डान्स करताना दिसत आहे. हॉलिवूड गायक ड्रेकच्या 'वन डान्स' गाण्यावर जबरदस्त मुव्ह्स करताना दिसत आहे. नोराच्या या डान्स व्हिडीओला तिच्या फॅन्सकडून भरभरून प्रेम मिळत आहे. तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून आतापर्यंत याला १६ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहे.

नोरा फतेहीने आपल्या डान्सच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. अनेक म्युझिक व्हिडीओत नोरा दिसली आहे. तर अनेक सिनेमातील तिचे डान्स नंबर्स चांगलेच गाजले. त्यासोबतच डान्स रिअॅलिटी शो बेस्ट डान्सरमध्ये ती जज म्हणूनही दिसली होती. 

नोराने बॉलिवूडमध्ये आपल्या कामाची सुरूवात २०१४ मध्ये केली होती. हिंदी सिनेमांसोबतच साऊथच्या अनेक सिनेमात ती आयटम नंबर करताना दिसली. तिला खरी ओळख मिळाली ती जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमाती दिलबर गाण्यामुळे. त्यानंतर ती बऱ्याच सिनेमात डान्स करताना दिसली.
 

Web Title: Nora Fatehi shows sexy dance moves shares summer time vibe video watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.