नोरा फतेहीने करिना कपूरच्या 'फेविकोल' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 02:54 PM2021-01-11T14:54:01+5:302021-01-11T14:54:20+5:30

नोरा सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते.

Nora fatehi latest video viral on social media she dancing on kareena kapoor fevicol song | नोरा फतेहीने करिना कपूरच्या 'फेविकोल' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

नोरा फतेहीने करिना कपूरच्या 'फेविकोल' गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फेतहीने पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.  नोरा सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या डान्सने आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. ती तिच्या व्हेकेशनचे फोटो, डान्स व्हिडीओ आणि म्युझिक व्हिडीओ फॅन्ससाठी शेअर करत असते. यावेळी नोरा करिना कपूरचे प्रसिद्ध गाणं 'फेविकोल' वर डान्स दिसतेय आहे.

यावेळी नोरा एकटी नाचत नाही तर तिच्यासोबत सिंगर तुलसी कुमारही डान्स करते आहे. डान्स करताना नोराच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स  पाहण्यासारखे आहेत. 


अलीकडे नोरा करिना कपूर हिच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये सहभागी झाली. यावेळी करिनासमोरच नोराने ही इच्छा व्यक्त केली. तैमूर तुझ्या डान्स मुव्हचा दिवाना आहे, असे करिनाने नोराला सांगितले. यावर नोराने थेट तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘तैमूर लवकर मोठा होईल, अशी आशा करते. तो मोठा झाला की मी त्याच्यासोबत साखरपुडा व नंतर लग्नाबद्दल विचार करू शकते,’असे नोरा म्हणाली. नोराचे हे शब्द ऐकून करिनाला हसू आवरले नाही. तैमूर आता फक्त 4 वर्षांचा आहे, त्याच्या लग्नाला आता बराच वेळ आहे, असे ती हसत हसत म्हणाली. यावर ‘काही हरकत नाही, मी वाट पाहीन,’ असे नोरा म्हणाली होती. 

Web Title: Nora fatehi latest video viral on social media she dancing on kareena kapoor fevicol song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.