'फेविकॉल' गाण्यावरील नोरा फतेहीचा बेली डान्स व्हिडीओ व्हायरल, पुन्हा पुन्हा बघताहेत फॅन्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 01:26 PM2020-09-25T13:26:33+5:302020-09-25T13:27:28+5:30

'फेविकॉल' या गाण्यावर तिने बेली डान्स केला ज्यात तिचा खास अंदाज बघायला मिळाला. नोराच्या या डान्सचं फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत.

Nora Fatehi dance on Kareena Kapoor fevicol song video goes viral on internet | 'फेविकॉल' गाण्यावरील नोरा फतेहीचा बेली डान्स व्हिडीओ व्हायरल, पुन्हा पुन्हा बघताहेत फॅन्स!

'फेविकॉल' गाण्यावरील नोरा फतेहीचा बेली डान्स व्हिडीओ व्हायरल, पुन्हा पुन्हा बघताहेत फॅन्स!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री-डान्सर नोरा फतेहीने तिच्या डान्सने सर्वांनाच थक्क केलं आहे. अनेकदा नोराने आपल्या डान्सने स्टेजवरही धमाका केला आहे. सध्या तिचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती करिना कपूरच्या 'फेविकॉल' या लोकप्रिय गाण्यावर ठुमके मारताना दिसत आहे. या गाण्यावर तिने बेली डान्स केला ज्यात तिचा खास अंदाज बघायला मिळाला. नोराच्या या डान्सचं फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत.

नोराचा हा व्हिडीओ तिच्या फॅन पेजवर शेअर केलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ७१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नोराचा हा व्हिडीओ झी सिने अवॉर्ड २०१८ मधील आहे. इथे तिला खास परफॉर्मन्ससाठी बोलवण्यात आलं होतं. या गाण्यावर तिने अफलातून डान्स तर केलाच सोबतच तिचा लूकही कमाल दिसत आहे. या डान्समुळे नोरा अधिक प्रकाशझोतात आली होती. 

नोरा सध्या इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये जज म्हणून दिसत आहे. मलायका अरोराला कोरोना झाल्यानंतर नोराला ती जागा देण्यात आली आहे. या शोमध्ये ती जज असली तरी आपल्या डान्सने सर्वांना मंत्रमूग्ध करून सोडलंय. कामाबाबत सांगायचं तर नोरा लवकरच भुज: द प्राइड ऑफ इंडिया मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच नोराच्या 'फछताओगे' गाण्याचं फीमेल व्हर्जन रिजील झालं होतं. ज्यात तिला वेगळा अंदाज बघायला मिळाला. तसेच नोरा स्ट्रीट डान्सर थ्रीडीमध्येही दिसली होती. 

'कमरिया' गाण्यावरील नोरा फतेहीच्या डान्सने सोशल मीडियात धुमाकूळ, व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघताहेत फॅन्स!

नोरा फतेही रेड ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

Web Title: Nora Fatehi dance on Kareena Kapoor fevicol song video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.