नुसरत जहांच्या आरोपांवर निखिल जैनने सोडलं मौन, म्हणाला - 'मी बायसेक्शुअल नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 12:39 PM2021-11-25T12:39:28+5:302021-11-25T12:39:56+5:30

दोघांचं लग्न कोलकातामधील कोर्टाने अमान्य ठरवलं होतं. आता बऱ्याच महिन्यांनंतर निखिल जैनने त्याच्यावर नुसरतने लावलेल्या आरोपांवर आपलं मौन सोडलं आहे.

Nikhil Jain break silence after Nusrat Jahan allegation says I am not bisexual | नुसरत जहांच्या आरोपांवर निखिल जैनने सोडलं मौन, म्हणाला - 'मी बायसेक्शुअल नाही'

नुसरत जहांच्या आरोपांवर निखिल जैनने सोडलं मौन, म्हणाला - 'मी बायसेक्शुअल नाही'

googlenewsNext

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) आणि निखिल जैन (Nikhil Jain) यांच्यात आता कोणतंही नातं राहिलेलं नाही. दोघेही वेगवेगळे होऊन आपापल्या मार्गाने गेले आहेत. २०१९ मध्ये दोघांनी केलेलं शाही लग्न चर्चेचा विषय ठरलं होतं. लग्नाच्या एका वर्षात दोघांमध्ये अंतर आल्याने फॅन्स हैराण झाले. दोघांचं लग्न कोलकातामधील कोर्टाने अमान्य ठरवलं होतं. आता बऱ्याच महिन्यांनंतर निखिल जैनने त्याच्यावर नुसरतने लावलेल्या आरोपांवर आपलं मौन सोडलं आहे.

निखिल जैन(Nikhil Jain) सोबतच्या नात्यात काही समस्या आल्याने नुसरत जहां (Nusrat Jahan) वेगळी राहू लागली होती. ज्यावेळी ती वेगळी झाली त्यावेळी आई बनणार होती. नुसरतने निखिलसोबतच्य लग्नाला स्वीकारण्यास नकार दिला. नुसरत म्हणाली होती की, त्यांचं लग्न तुर्कीमध्ये झालं होतं आणि भारतात हे लग्न स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार रजिस्टर नाही. त्यामुळे हे लग्न  भारतात वैध नाही. कोर्टानेही याला दुजोरा दिला होता.

आरोप फेटाळले

नुसरतने वेगळी झाल्यावर निखिल जैन हा बायोसेक्सुअल असल्याचा आरोप लावला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या आरोपांवरून मौन सोडलं. तो म्हणाला की, त्याच्यावर अनेक आरोप लावले गेले, जे चुकीचे आहेत. या आरोपांपैकी एक आरोप म्हणजे निखिल जैन हा बायसेक्शुअल आहे हा होता. यावर तो म्हणाला की, मी बायसेक्शुअल नाही. यावेळी त्याने हेही मान्य केलं की, त्याचं अजूनही नुसरत जहांवर प्रेम आहे.

यश दासगुप्ता आणि नुसरत एकत्र

निखिल जैनसोबत लग्न आणि नंतर आई बनण्याच्या बातमीनंतर निखिलसोबत लग्न तोडणे आणि नंतर अभिनेत यश दासगुप्तासोबत अफेअरमुळे नुसरत जहां चांगलीच चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच नुसरतने बाळाला जन्म दिला. त्याला तिने वडील म्हणून यश दासगुप्ताचं नाव दिलं आहे. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 
 

Web Title: Nikhil Jain break silence after Nusrat Jahan allegation says I am not bisexual

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.