बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि हॉलीवूड सिंगर निक जोनास यांच्या अफेअरची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. त्यांनतर त्यांचे लग्नदेखील चर्चेचा विषय ठरला होता. प्रियंका आणि निक बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतात. कधी कधी सोशल मीडियावरील फोटोंमुळे तर कधी महागड्या वस्तुंमुळे. खरेतर त्या दोघंबद्दल जाणून घ्यायला त्यांचे चाहते उत्सुक असतात. आता तर निकने त्या दोघांच्या फर्स्ट डेटबद्दल सांगितले आहे.

निकने त्यांच्या पहिल्या डेटला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या दोघांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि या डेट बद्दल सांगितले.

तो म्हणाला की,  'एक वर्षांपूर्वी या दिवशी आम्ही ब्युटी अँड बिस्ट हॉलिवूड मधील काही फ्रेंडस सोबत पहायला गेलो होतो. या सोबतच त्याने मी आणि प्रियंका खूप खूश दिसत होतो असे लिहीत सांगितले की माझ्या महिला फ्रेंडस मधील प्रियंका ही एकमेव व्यक्ती आहे जी माझी बेस्ट फ्रेंड, माझा आत्मविश्वास, माझे संगीत आणि माझी सुंदर पत्नी आहे. आमच्या एकत्र सुंदर प्रवासामूळे स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो. तुझ्यामुळे नेहमी माझ्या चेहऱ्यावर हास्य असते आणि मी सर्वोत्तम व्हावे यासाठी मला तू प्रेरणा देतेस. तुझा नवरा बनण्याचे अहोभाग्य मला लाभले आहे. आय लव यु.'


निकच्या या पोस्टवर प्रियंकाने म्हटले, 'माझ्या आयुष्यातील सर्वात अमेझिंग गोष्ट तू आहेस.आय लव यु बॅब्स'


मेट गाला याच इव्हेंटमध्ये प्रियंका व निक जोनास यांची पहिली भेट झाली होती.  २०१७मध्ये मेट गालाच्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते.

निकची ‘डेट’बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज 'क्वांटिको'च्या सेटवर झाली होती. 


Web Title: Nick Jonas Reveals the Exact Details of His First Date With Priyanka Chopra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.