Exclusive : अ‍ॅडशूटसाठी बिकनी न घालण्याच्या निर्णयावर वाणीने केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

By गीतांजली | Published: September 10, 2019 11:53 AM2019-09-10T11:53:37+5:302019-09-10T12:10:34+5:30

लोकमतला दिलेल्या मुलाखतीत वाणीने बिकनीबाबत प्रश्न विचारता हा खुलासा केला आहे.

News that i will not wear bikini its all fake - vaani kapoor | Exclusive : अ‍ॅडशूटसाठी बिकनी न घालण्याच्या निर्णयावर वाणीने केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

Exclusive : अ‍ॅडशूटसाठी बिकनी न घालण्याच्या निर्णयावर वाणीने केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

googlenewsNext

‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या वाणी कपूरच्या खात्यात फार चित्रपट नाहीत. पण यानंतरही बॉलिवूडमध्ये तिने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. वाणीने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. मॉडेलिंगच्या काळातच यशराज फिल्म्सच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’साठी ऑडिशन्स सुरु असल्याचे तिला कळले. ती ऑडिशनला गेली. तिची निवड झाली. गेल्या काही दिवसांपासून वाणी एक वेगळ्या कारणाला घेऊन चर्चेत होती. तिने एका जाहिरात बिकनीमध्ये शूट करायची होती. वाणी चित्रपटात बिकनीमध्ये झळकली आहे. मात्र जाहिरातीत बिकनी परिधान करण्यास नकार दिला.

वाणीच्या मते जाहिरातीत बिकनी घालणं योग्य नाही. तिचं म्हणणं आहे की, कोणत्याही चित्रपटांपेक्षा जाहिरातीतून जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. तसेच ती जाहिरात पुढे अनेक वर्ष वापरली जाते. अशात जर बिकिनी घालून जाहिरात केली तर इमेजला त्रास होऊ शकतो अशा आशयाच्या बातम्या सगळीकडे झळकत होत्या.  मात्र लोकमतला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा वाणीने केला आहे. वाणीने या सगळ्या गोष्टींचे खंडन केले आहे. ती म्हणाली, या सगळ्या बातमा केवळ अफवा आहे, असे काहीचं घडलेलं नाही.''


लवकरच वाणी  हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत वॉर सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात ती कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पहिल्यांदा वाणी हृतिक आणि टायगरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्यानंतर ती रणबीर कपूर आणि संजय दत्तच्या ‘शमशेरा’मध्ये झळकणार आहे. 

 

करण मल्होत्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. या अ‍ॅक्शनपटात संजय दत्त निगेटीव्ह रोलमध्ये असून रणबीर व संजयची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र दिसणार आहे.  

Web Title: News that i will not wear bikini its all fake - vaani kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.