दरभंगामधील एका नवजात बालकाचं नाव ठेवलं सोनू सूद, ही आहे त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 01:15 PM2020-05-28T13:15:29+5:302020-05-28T13:16:25+5:30

सोनू सूद प्रवासी मजूर, गर्भवती महिलांसाठी देवदूत बनला आहे. देशभरातून त्याच्या कामाचे कौतूक होत आहे.

New born child named as Sonu Sood, he helped workers for Darbhanga TJL | दरभंगामधील एका नवजात बालकाचं नाव ठेवलं सोनू सूद, ही आहे त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी

दरभंगामधील एका नवजात बालकाचं नाव ठेवलं सोनू सूद, ही आहे त्यामागची इंटरेस्टिंग स्टोरी

googlenewsNext

अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत येतो आहे. आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे की सोनू सूद प्रवासी मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. मुंबईतून दरभंगा येथे पोहचलेल्या प्रवासी गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला, त्यानंतर तिने तिला घरी सुखरुप पोहचवणाऱ्या सोनू सूदचे नाव बाळाला देण्याचा निर्णय घेतला.

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या प्रवासी मजूरांना केलेल्या मदतीमुळे सोनू सूद चर्चेत आला आहे. मजूरांना मुंबईतून त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी मदत करणारा सोनू सूद त्यांच्यासाठी देवदूत बनला आहे. त्यामुळे कोणी त्याला पद्मभूषण देण्याची मागणी करत आहे तर कुणी त्याला सुपरहिरो समजत आहे. कठीण काळात दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून आलेल्या सोनू सूदसोबत एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली आहे.

सोनूने सांगितले की, 12 मे रोजी प्रवासी मजूरांचा ग्रुप त्याने दरभंगाला पाठवले होते. त्यात दोन गर्भवती महिलादेखील होत्या. घरी पोहचल्यानंतर त्यातील एका महिलेने बाळाला जन्म दिला. तिच्या कुटुंबाने फोन करून सांगितले की नवजात बालकाचे नाव सोनू सूद ठेवले आहे. ही गोष्ट सोनू सूदला खूप भावली आहे.
सोनू सूद पुढे म्हणाला की, त्याला भारतातून जवळपास 56 हजार मेसेज आले आहेत. लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे, हे पाहून तो खूप खूश आहे. तसेच त्याची कामगिरी पाहून महाराष्ट्राचे राज्यपालदेखील प्रभावित झाले. बुधवारी भगत सिंग कोश्यारी यांनी फोन करून त्याचे कौतूक केले.


सोनू सूदने राज्यपालांचे ट्विटवर आभार मानले. त्याने भगत सिंग कोश्यारी यांना विश्वास देत लिहिले की, तुमच्या शब्दांनी मला जास्त मेहनत करण्यासाठी प्रेरीत केले आहे. मी प्रवासी मजूरांची मदत तोपर्यंत करणार जोपर्यंत ते सगळे आपल्या कुटुंबातील लोकांना भेटत नाहीत. माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे.

Web Title: New born child named as Sonu Sood, he helped workers for Darbhanga TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.