वादग्रस्त विधानावरून नेटकऱ्यांनी घेतली रिचा चढ्ढाची अजब शाळा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:38 PM2020-08-30T17:38:59+5:302020-08-30T17:41:26+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिची नेटकऱ्यांनी ट्विटरवर शाळा घेतली आहे. तिला चांगलेच फैलावर घेतल्याचे समजतेय.

Netizens take Richa Chadha's strange school from controversial statement !! | वादग्रस्त विधानावरून नेटकऱ्यांनी घेतली रिचा चढ्ढाची अजब शाळा!!

वादग्रस्त विधानावरून नेटकऱ्यांनी घेतली रिचा चढ्ढाची अजब शाळा!!

googlenewsNext

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय संशयितांची कसून चौकशी करत आहेत. यासंदर्भात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच सुशांतला ड्रग्सचे व्यसन होते अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडूनही याप्रकरणी तपास सुरु आहे तसेच दुसरीकडे सुशांतसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सुशांत ड्रग्सचे सेवन करत नव्हता असे सांगितले. आता बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने ट्विट करत मारिजुआना (गांजा) घेण्याचे फायदे सांगत वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर तिच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला असून ट्विटरवर युजर्सनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. 

अभिनेत्री रिचा चढ्ढा ही अधुनमधूनच पण अत्यंत वादग्रस्त विधान करताना दिसते. सध्या सुशांत मृत्यूप्रकरणी वेगवेगळे प्रकार समोर येत असताना रिचाने टिवट केल्याचे समजतेय. या ट्विटमध्ये ती मारिजुआनाला ड्रग्स बोलण्यांवर संतापली आहे. ‘ज्यावेळी संपूर्ण देशात मारिजुआनाचे (गांजा) औषधी फायदे समोर येत आहेत तेव्हा आपल्यातले काही अडाणी त्यांना ड्रग्सची उपमा देत आहेत. कृपया थोडा अभ्यास करा आणि निसर्गाकडून मिळालेल्या भेटीचा अपमान करु नका. अज्ञानी लोकांना आपल्याला लाभलेला वारसा आणि विश्वासाचा अपमान करण्याचा अधिकार नाही,’ या आशयाचे ट्विट रिचा चढ्ढाने केले आहे. तिच्या या दाव्यावरून वाद निर्माण झाला असून ट्विटरवर काही युजर्सनी तिला चांगलेच सुनावले आहे. 

युजर्स म्हणतात, ‘गांजाचा वापर वैद्यकीय क्षेत्रात केला जातो हे जरी खरं असलं तरी त्याचा वापर मर्यादित स्वरुपात करणे अपेक्षित असते. तुम्ही मनात येईल तेव्हा गांजाचं सेवन करणे हे व्यसनच आहे. बहुधा तूच आधी थोडा अभ्यास करणे गरजेचे असून अर्धवट ज्ञान हे कधीही घातकच आहे,’ असे एका ट्विटर युजरने सुनावले आहे.

Web Title: Netizens take Richa Chadha's strange school from controversial statement !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.