‘बाईपास रोड’मधून होणार नील नितीन मुकेशचा भाऊ नमन नितीन मुकेशचा डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:00 AM2019-03-05T06:00:00+5:302019-03-05T06:00:04+5:30

बॉलिवूड अभिनेता, निर्माता नील नितीन मुकेश सध्या ‘बाईपास रोड’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाबद्दलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटाद्वारे नीलचा भाऊ नमन नितीन मुकेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.

neil nitin mukesh shooting for bypass road naman nitin mukesh debut as a director | ‘बाईपास रोड’मधून होणार नील नितीन मुकेशचा भाऊ नमन नितीन मुकेशचा डेब्यू!!

‘बाईपास रोड’मधून होणार नील नितीन मुकेशचा भाऊ नमन नितीन मुकेशचा डेब्यू!!

googlenewsNext
ठळक मुद्देलहान भावासोबत काम करताना साहजिकच नील प्रचंड उत्साहित आहे. नील यात एका दिव्यांगाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता, निर्माता नील नितीन मुकेश सध्या ‘बाईपास रोड’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाबद्दलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटाद्वारे नीलचा भाऊ नमन नितीन मुकेश बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. अर्थात अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून.
होय, ‘बाईपास रोड’ हा चित्रपट नमन दिग्दर्शित करणार आहे. नमनने याआधी बिजॉय नांबियार आणि अब्बास मस्तान यांच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. अनेक जाहिरातीही त्याने दिग्दर्शित केल्या आहेत. नमनचा हा चित्रपट एक थ्रीलर ड्रामा आहे. नील नितीन यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री शमा सिकंदर यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहे. अदा शर्मा, गुल पनाग आणि रजित कपूर यांच्याही यात प्रमुख भूमिका आहेत.


लहान भावासोबत काम करताना साहजिकच नील प्रचंड उत्साहित आहे. नील यात एका दिव्यांगाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्याचे कंबरेखालचे अख्खे शरीर अधू आहे. यासाठी नीलने बरीच तयारी केली. अगदी वजनही वाढवले.

‘साहो’ या चित्रपटासाठी नीलने अतिशय मेहनतीने शरीर कमावले होते. पण ‘बाईपास रोड’ नीलला वजन वाढवावे लागले. कारण व्हिलचेअरवर बसलेली व्यक्ति सिक्स पॅकमध्ये असू शकत नाही. तूर्तास नीलकडे साहो, फिरकी, इक्का असे अनेक चित्रपट आहेत. पण भावाचा पहिला चित्रपट म्हटल्यावर नील आनंदात आहेत. आता नील-नमन या जोडीचा  ‘बाईपास रोड’ प्रेक्षकांना कोणता प्रवास घडवतात आणि या प्रवासाचे फलित काय, ते बघूच.

Web Title: neil nitin mukesh shooting for bypass road naman nitin mukesh debut as a director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.