लैंगिक शोषणाविरोधात बोलली नेहा धुपिया; ‘तुम्ही जर पीडित असाल तर पुढे या अन् यावर बोला’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 12:12 PM2017-12-13T12:12:24+5:302017-12-13T17:42:24+5:30

सध्या जगभरात #MeToo हे अभियान राबविले जात असून, त्याअंतर्गत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला जात आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी तथा ...

Neha Dhupia speaks out against sexual exploitation; 'If you are a sufferer then talk about this one further'! | लैंगिक शोषणाविरोधात बोलली नेहा धुपिया; ‘तुम्ही जर पीडित असाल तर पुढे या अन् यावर बोला’!

लैंगिक शोषणाविरोधात बोलली नेहा धुपिया; ‘तुम्ही जर पीडित असाल तर पुढे या अन् यावर बोला’!

googlenewsNext
्या जगभरात #MeToo हे अभियान राबविले जात असून, त्याअंतर्गत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला जात आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटी तथा महिलांनी या अभियानांतर्गत त्यांच्याशी घडलेली आपबिती सांगितली. या अभियानाविषयी जागरूकता करीत असलेली अभिनेत्री नेहा धुपियाच्या मते, ‘हे अभियान केवळ मनोरंजन क्षेत्रातीलच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील लोकांकरिता आहे. नेहाने म्हटले की, ‘पीडितांनी त्यांच्याशी घडलेले अशाप्रकारचे प्रसंग सांगण्यास अजिबातच संकोच करायला नको. उलट न घाबरता खुलासा करायला हवा, जेणेकरून निर्दोष असलेल्यांना न्याय मिळेल. खरं तर आपल्या समाजात खूप बदल घडत आहेत. परंतु अजून बरेच काही करणे बाकी आहे.’

नेहाने आयएएनएसशी फोनवर बोलताना याविषयी आपले मत व्यक्त केले. तिने म्हटले की, ‘महिलांसाठी समाजात बरेचसे बदल होत आहेत. त्यांना सत्तेतही सहभागी करून घेतले जात असल्याने ही एकप्रकारची परिवर्तनाची नांदीच आहे. यावेळी नेहाने ‘सीक्रेट सुपरस्टार’, ‘तुम्हारी सुलू’, ‘पद्मावती’ या चित्रपटांचा उल्लेख करताना, या महिलाकेंद्रित चित्रपटांमध्ये महिला प्रमुख भूमिकांमध्ये दिसत असल्याने तो महिलांचा मोठा सन्मान आहे. नेहाने हॉलिवूड चित्रपट निर्माता हार्वे विन्स्टीन यांच्या विरोधात करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवरही आपले मत व्यक्त केले. हार्वे यांच्यावर बेन एफ्लेक, ब्रेट रटनर, चार्ली शीन, डिस्टन हॉफमॅन, जेम्स टोबेक आणि केविन स्पेसी यांसारख्या प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले. या आरोपांमुळे हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. 

अन्य कलाकारांप्रमाणे नेहादेखील या मताशी सहमत आहे की, लैंगिक शोषण केवळ मनोरंजन क्षेत्रापूरतेच मर्यादित नाही. नेहाने म्हटले की, मी दाव्याने सांगू शकते लैंगिक शोषण केवळ मनोरंजन क्षेत्राशी संबंधित नसून, ज्या क्षेत्रात महिला कार्यरत आहेत त्याठिकाणी असे प्रकार आजही घडत आहेत. त्यामुळे कोणीही या प्रकाराला बळी पडू शकते. त्यामुळे मी विनंती करते की, जर तुम्ही पीडित असाल तर बिनधास्तपणे यावर तुमचे मत मांडा. कारण तुम्ही असे केल्यास स्वत:चे तर संरक्षण करणारच शिवाय त्या महिलांचेही संरक्षण कराल ज्या यास बळी पडू शकतात. खरं तर तुम्ही यावर बोलले तर तुम्ही कमजोर नव्हे तर धाडसी महिला म्हणून ओळखल्या जाल. 

माजी मिस इंडिया असलेल्या नेहाने सांगितले की, ‘आयुष्य सुखकर होत आहे, परंतु अशा काही गोष्टी घडत आहेत ज्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे लोकांनी याविषयीचा सकारात्मक अर्थ लक्षात घेऊन आपला आवाज बुलंद करायला हवा, असेही नेहाने सांगितले. 

Web Title: Neha Dhupia speaks out against sexual exploitation; 'If you are a sufferer then talk about this one further'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.