बायोपिकमध्ये ‘या’ दोनपैकी एक हिरो हवा..., गोल्ड जिंकण्यापूर्वी नीरज चोप्रानं सांगितली होती इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:15 AM2021-08-10T11:15:11+5:302021-08-10T11:16:30+5:30

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या जाम चर्चेत आहे. आता तर नीरज चोप्राच्या बायोपिकचीही चर्चा आहे.

Neeraj Chopra wants either Randeep Hooda or Akshay Kumar to act in his biopic | बायोपिकमध्ये ‘या’ दोनपैकी एक हिरो हवा..., गोल्ड जिंकण्यापूर्वी नीरज चोप्रानं सांगितली होती इच्छा

बायोपिकमध्ये ‘या’ दोनपैकी एक हिरो हवा..., गोल्ड जिंकण्यापूर्वी नीरज चोप्रानं सांगितली होती इच्छा

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या बायोपिकमध्ये अक्षयने भूमिका साकारावी अशी नीरज चोप्राची इच्छा आहे. अक्षयला मात्र त्याच्या बायोपिकमध्ये नीरज हवा आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या जाम चर्चेत आहे. त्याने केलेल्या सुवर्णकामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच अक्षरश: त्याच्या प्रेमात पडले आहेत. आता तर नीरज चोप्राच्या बायोपिकचीही चर्चा आहे. होय, नीरजवर बायोपिक येणार, अशी ही चर्चा आहे. पण हे बायोपिक प्रत्यक्षात बनलंच तर याचा हिरो कोण असेल? स्वत: नीरजला त्याच्या बायोपिकमध्ये कोणाला पाहायला आवडेल, हे तुम्हाला माहित आहे?

नीरजने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याआधीच यासाठी दोन अभिनेत्यांची नावं निश्चित केली आहे. होय, त्याच्या बायोपिकसाठी त्याने दोन अभिनेत्यांच्या नावांना पसंती दिली आहे. यापैकी कोणी एक त्याच्या बायोपिकचा हिरो असावा, अशी त्याची इच्छा आहे. खास म्हणजे, नीरज चोप्रा आत्ता इतका लोकप्रिय नव्हताच,तेव्हाच त्याने ही इच्छा बोलून दाखवली होती.
2018 मध्ये त्याने एका वेबपोर्टलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तो त्याच्या बायोपिकवर बोलला होता. भविष्यात कोणी माझ्यावर चित्रपट बनवलाच तर त्यात अक्षय कुमार (Akshay Kumar) किंवा रणदीप हुड्डा (Randeep Hooda) या दोघांपैकी एक हिरो असावा, अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती.

अक्षय कुमार म्हणाला...
आपल्या बायोपिकमध्ये अक्षयने भूमिका साकारावी अशी नीरज चोप्राची इच्छा आहे. अक्षयला मात्र त्याच्या बायोपिकमध्ये नीरज हवा आहे. होय, नीरजने त्याच्या बायोपिकमध्ये तू काम करावं, अशी इच्छा आहे, असे सांगितल्यावर अक्षयला हसू आवरले नाही. माझ्या मते, मी नीरजच्या बायोपिकमध्ये काम करण्यापेक्षा त्यानेच माझ्या बायोपिकमध्ये काम करायला हवे. नीरज हँडसम आहे. माझे बायोपिक बनले तर त्याने लीड भूमिका साकारावी, असे अक्षय म्हणाला.  
नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर अक्षयने त्याला टिष्ट्वटरवर शुभेच्छा दिल्या होत्या. ‘ सुवर्ण पदक जिंकून नीरज चोप्रा तू एक नवीन इतिहास रचला आहे... तुमचे खूप खूप

Web Title: Neeraj Chopra wants either Randeep Hooda or Akshay Kumar to act in his biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.