ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटवर एक पोस्ट करत त्यांना सिनेमात काम देण्याची मागणी केली होती.

आपल्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री नीना गुप्ता यांचे ताजे फोटो पाहाल तर थक्क व्हाल. होय, वयाची साठी ओलांडलेल्या नीना यांनी सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. फ्रॉक का शॉक... गजराज सरांनी काढलेला फोटो,असे त्यांनी हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. या फोटोत नीनांनी पिवळ्या रंगाचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातलेला दिसतोय.
साहजिकच नीना यांच्या या लूकवर चाहते फिदा आहेत. अनेकांनी त्यांच्या या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. अशात हा फोटो व्हायरल झाला नसेल तर नवल.


नीना यांनी मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या एका ‘बोल्ड’ निर्णयाने.

8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा.


8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. आजही नीना तितक्याच बोल्ड आहेत. साठी ओलांडल्यानंतरही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यात आहेत. माझ्या  बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या. 


 काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटवर एक पोस्ट करत त्यांना सिनेमात काम देण्याची मागणी केली होती. त्यांची ही ट्विटर पोस्ट खूप व्हायरल सुद्धा झाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: neena gupta photo in short dress going viral on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.