निमित्त होते आयुष्यमानच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचे मात्र या 60 वर्षाच्या अभिनेत्रीनेच वेधले सा-यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 11:34 AM2020-01-23T11:34:34+5:302020-01-23T11:41:25+5:30

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ नावाच्या या सिनेमा. होमोसेक्शुअ‍ॅलिटीवर आधारित असलेल्या या सिनेमात एका समलैगींक कपल (गे)ची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.

Neena Gupta Hot loooks attracted Everyone EyeBall At The Launch Of Shubh Mangal Zyada Saavdhan | निमित्त होते आयुष्यमानच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचे मात्र या 60 वर्षाच्या अभिनेत्रीनेच वेधले सा-यांचे लक्ष

निमित्त होते आयुष्यमानच्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचे मात्र या 60 वर्षाच्या अभिनेत्रीनेच वेधले सा-यांचे लक्ष

googlenewsNext

आयुष्यमान खुरानाचा आगामी सिनेमा शुभ मंगल ज्यादा सावधान सिनेमाचे नुकतेच धुमधडाक्यात ट्रेलर लॉन्च करण्यात आले. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती. नेहमीप्रमाणे सारेच आपली हटकी स्टाइल करत या सोहळ्याला अवतरले. मात्र जेव्हा अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एंट्री घेतली तेव्हा मात्र आपसुकच सा-यांच्याच्या नजरा फक्त आणि फक्त नीना गुप्ताकडेच होत्या. 


यावेळी अतिशय ग्लॅमरस अंदाजात नीना यांनी या एव्हेंटला हजेरी लावली होती. नीना गुप्ता या 60 वर्षाच्या आहेत. मात्र आजही त्या इतक्या फिट एँड फाइन पाहून त्यांच्या वयाचा आंदाज बांधनेही अशक्यच. नीनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की नीना तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय  त्यांचे सौंदर्य आजही अबाधित आहे. 


‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ नावाच्या या सिनेमा. होमोसेक्शुअ‍ॅलिटीवर आधारित असलेल्या या सिनेमात एका समलैगींक कपल (गे)ची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. ट्रेलरचे म्हणाल तर, यातील डायलॉग्स चांगलेच इंटरेस्टिंग आहेत. आयुषमानला ‘गे’च्या भूमिकेत पाहणेही तितकेच इंटरेस्टिंग आहे. को-स्टार जितेन्द्रसोबतचा त्याचा रोमान्सही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो आहे. रोमान्स, ह्युमर, कॉमेडी असा हा मसालेदार ट्रेलर सध्या चांगलाच गाजतोय.
 

Web Title: Neena Gupta Hot loooks attracted Everyone EyeBall At The Launch Of Shubh Mangal Zyada Saavdhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.