अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी मसाबा ही फॅशन जगतातील नावाजलेली व्यक्ती आहे. नुकताच तिने निर्माते मधु मंटेनासोबत घटस्फोट घेतला आहे. नीना गुप्ता यांनी याबाबत चुप्पी साधली होती. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपले मौन सोडले आहे.

मसाबा आणि निर्माता मधु मंटेना २०१५ साली विवाहबंधनात अडकले. पण अवघ्या दोन वर्षात त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही महिने तात्पुरते वेगळे राहुन पाहिल्यावर अखेर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि तो जाहीर केला.

एका चॅट शोमध्ये याबाबत नीना गुप्ता यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, कुठल्याही आईला बसला असता तितकाच धक्का मला सुद्धा बसला, एका साधारण आईप्रमाणेच मी देखील तिला कोणताही निर्णय घाईत घेऊ नकोस असाच सल्ला दिला. नीट विचार कर आणि ठरव असे सांगितले. 


नीना गुप्ताला व तिचे पती विवेक मेहरालादेखील मधु खूप आवडायचे आणि आजही आवडत असल्याचे नीना गुप्ता यांनी सांगितले. व पुढे म्हणाल्या की, तो एक चांगला माणूस आहे, पण त्यांचे एकमेकांशी जमत नसेल तर त्याला काय करता येणार आहे. आम्ही तिला म्हणालो विचार कर यावर, असे नाही की त्यांनी तडकाफडकी हा निर्णय घेतला, त्या दोघांनी खूप विचार केला या सगळ्यावर. मात्र माझ्यासाठी हे शॉकिंग आहे.


मसाबा आणि मधु यांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला हे समजू शकले नाही. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी २०१५ साली लग्नबेडीत अडकण्याचा निर्णय घेतला होता. पण दोन वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला.

तसेच त्या दोघांनी मीडियाला विनंती केली होती की या प्रसंगात त्यांना थोडा वेळ एकटे राहू द्यावे आणि फार काही विचारु नये. दोघांकडून अधिकृतपणे हे जाहीर करत आम्ही तरीही एकमेकांचा आदर करतो असे दोघांनीही नमूद केले होते.


Web Title: Neena Gupta on daughter Masaba Gupta and Madhu Mantena filing for divorce: It was a very big shock to me
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.