ठळक मुद्देबायोग्राफीत नवाजने सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन अभिनेत्रींचा उल्लेख केला होता. त्यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल सविस्तर लिहिले होते. माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींच्या प्रेमापेक्षा त्यांच्या शरीरात अधिक रस होता, अशी बेधडक कबुली त्याने दिली होती.  

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज म्हणजेच १९ मे ला वाढदिवस असून उत्तर प्रदेश मधील एका छोट्याशा गावात त्याचा जन्म झाला आहे. अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या नवाझने त्याच्या मेहनीतच्या जोरावर त्याचे एक बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे. 

नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्ये दिसला. ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खरी दिशा मिळाली. 

नवाजने त्याच्या या संघर्षावर अॅन ओरडीनरी लाईफः अ मेमोईर ही बायोग्राफी लिहिली होती. पण ही बायोग्राफी चांगलीच वादात अडकली होती. कारण त्याने यात सुनीता राजवार आणि निहारिका सिंग या दोन अभिनेत्रींचा उल्लेख केला होता. त्यांच्यासोबतच्या अफेअरबद्दल त्याने सविस्तर लिहिले होते. मला माझ्या आयुष्यात आलेल्या मुलींच्या प्रेमापेक्षा त्यांच्या शरीरात अधिक रस होता, अशी बेधडक कबुली त्याने या पुस्तकातून दिली होती.  निहारिकाबद्दल तर त्याने अगदीच खुलेपणाने लिहिले होते. निहारिकाला माझ्याकडून प्रेम हवे होते. पण मी एक स्वार्थी पुरुष होतो. माझा उद्देश स्पष्ट होता. तिच्या घरी जायचे. शरीरसुख घ्यायचे आणि नंतर तिथून निघून यायचे,असे नवाजने यात म्हटले होते. नवाजच्या या खुलाशावर निहारिकाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. नवाजची बायोग्राफी पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे तिने म्हटले होते.

नवाजची पूर्वप्रेयसी सुनीता राजवार हिनेही या बायोग्राफीवर आक्षेप नोंदवला होता. मी गरीब असल्याने सुनीताने मला सोडले, असे नवाजने बायोग्राफीत लिहिले होते. पण सुनीताने नवाजचा हा दावा फेटाळून लावला होता. 

नवाजची ही बायोग्राफी प्रचंड वादात अडकल्यानंतर त्याने सगळ्यांची माफी मागत ती मागे घेतली होती. 


Web Title: Nawazuddin Siddiqui Birthday Special: Nawazuddin Siddiqui mentions Sunita Rajwar and and Niharika Singh name in Biography
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.