Nawazuddin Says on 'Father's Day'; 'All three of my fathers threatened me' | 'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’
'Fathers Day' निमित्त नवाजुद्दीनचा खुलासा; म्हणे ‘माझ्या तिन्ही वडिलांनी मला धोका दिला’

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मध्यंतरी ‘सेक्रेड  गेम्स’ या नेटफ्लिक्समुळे चांगलाच चर्चेत होता. आता पुन्हा त्याचा  दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच ‘सेक्रेड गेम्स २’चा प्रीमीयर होणार आहे.  पहिल्या नेटफ्लिक्सला प्रचंड यश मिळाले होते. यातील गणेश गायतोंडे हे त्याचे कॅरेक्टर  प्रेक्षकांना प्रचंड भावले. त्याने ‘फादर्स डे’ निमित्ताने एक वेगळाच खुलासा केला असल्याचे समजतेय. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. 


               सैफ अली खान, राधिका आपटे आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर या सीरिजला विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केले आहे. या सीरिजच्या दुसऱ्या  भागासाठी विक्रमादित्य यांनी नीरज घैवान यांना रिप्लेस केले आहे. नवाजुद्दीनने साकारलेल्या गणेश गायतोंडेचा एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. यात त्याने म्हटले आहे की,‘माझे तीन वडिल आहेत. पहिल्याने मला भीती दाखवली. दुसऱ्याने सामर्थ्य दिले आणि तिसºयाला सर्वांत जास्त प्रेम केले तर त्याने मला धोका दिला. तिन्ही वडिलांना मला एकच गोष्ट सांगायची आहे, ‘हॅप्पी फादर्स डे’!       

              नवाजुद्दीनने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, ‘पापा कहते हैं बडा नाम करेगा, गणेश हमारा ऐसा काम करेगा..हॅप्पी फादर्स डे...गणेश गायतोंडेने आपल्या आयुष्यात तिघांना वडिल मानले आहे. एक त्यांचे खरे वडील ज्यांनी गणेशला गुन्हेविश्वात उभे राहण्यासाठी मदत केली. नवाजच्या दुसऱ्या  काकांची भूमिका  नवाब शाह यांनी साकारली असून तसेच गुरूजी पंकज त्रिपाठीने त्याच्या तिसऱ्या  वडिलांची भूमिका साकारली आहे. असे वाटतेय की, दुसऱ्या  भागात गुरूजींच्या भूमिकेबाबत विस्तार करण्यात येईल.


Web Title: Nawazuddin Says on 'Father's Day'; 'All three of my fathers threatened me'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.