बिग बींची नात 'गली बॉय'च्या प्रेमात; सिद्धांत चतुर्वेदीला करतीये डेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 05:20 PM2021-11-17T17:20:36+5:302021-11-17T17:22:02+5:30

Navya naveli nanda: नव्या गेल्या कित्येक महिन्यांपासून गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

navya naveli nanda dating gully boy actor siddhant chaturvedi | बिग बींची नात 'गली बॉय'च्या प्रेमात; सिद्धांत चतुर्वेदीला करतीये डेट?

बिग बींची नात 'गली बॉय'च्या प्रेमात; सिद्धांत चतुर्वेदीला करतीये डेट?

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. खरं पाहायला गेलं तर सेलिब्रिटींच्या अफेअर, ब्रेकअप, रिलेशनशीप या गोष्टी चाहत्यांसाठी नव्या नाहीत. मात्र, दरवेळी या सेलिब्रिटींच्या आयुष्यात काही ना काही नवी गोष्टी घडत असतात ज्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चर्चा होते. गेल्या कित्येक दिवसांपासून कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. अलिकडेच राजकुमार राव (rajkumar rao) आणि पत्रलेखा (patrlekhaa) यांनी लग्न केलं. त्यामुळे त्यांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या दोघांची चर्चा थांबत नाही. तोच आता अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) म्हणजेच बिग बींच्या नातीची नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिची चर्चा सुरु झाली आहे.  नव्या एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आणि अरजित तनेजा (Arjit Taneja) यांच्या रिलेशनशीपची चर्चा सुरु होती. त्यानंतर नव्याच्या अफेअरची चर्चा सुरु झाली आहे. नव्या गली बॉय फेम एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांचं अफेअर असल्याचंदेखील सांगण्यात येत आहे. 

एका हिंदी वेबसाईटच्या माहितीनुसार, नव्या गेल्या कित्येक महिन्यांपासून गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला (Siddhant Chaturvedi)  डेट करत आहे. इतकंच नाही तर नव्याच्या एका जवळच्या व्यक्तीने या वृत्ताला दुजोराही दिल्याचं म्हटलं जात आहे.  परंतु, नव्या किंवा सिद्धांत या दोघांपैकी कोणीही यावर प्रतिक्रिया दिली नाही. या दोघांनीही या चर्चांवर मौन बाळगणं पसंत केलं आहे.

दरम्यान, रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला गली बॉय सुपरहिट ठरल्यानंतर बिग बींनी स्वत:  सिद्धांतला फुलांचा पुष्पगुच्छ पाठवला होता. इतकंच नाही तर अनेकदा नव्या आणि सिद्धांत यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. नव्याने फोर्डम युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तर, सिद्धांत लवकरच फोन बूथ या चित्रपटात झळकणार आहे.
 

Web Title: navya naveli nanda dating gully boy actor siddhant chaturvedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.