नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसली शेतात घाम गाळताना, नांगर चालवतानाच्या व्हिडीओला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 01:08 PM2021-03-20T13:08:28+5:302021-03-20T13:08:50+5:30

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

National Crush Rashmika Mandana seen plowing in the field, plowing video gets likes | नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसली शेतात घाम गाळताना, नांगर चालवतानाच्या व्हिडीओला मिळतेय पसंती

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसली शेतात घाम गाळताना, नांगर चालवतानाच्या व्हिडीओला मिळतेय पसंती

googlenewsNext

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात रश्मिका सोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार असून, सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. 

अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे आणि ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. रश्मिकाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रश्मिकाने लिहिले की, ‘गीत ऐका आणि व्हिडीओ बघा. यापेक्षाही उत्तम काहीही असू शकत नाही. या सीनच्या शूटिंगनंतर मीसुद्धा असाच विचार करत होते. मला हे पात्र साकारण्यात किती मजा आली असेल, हे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता.’ 


या व्हिडीओत ती शेतात नांगर चालवताना दिसते आहे. रश्मिका हे काम मनापासून करताना दिसते आहे. या व्हिडीओत तिचा लूकही संपूर्ण ग्रामीण महिलेसारखा आहे. तिने सैल शर्टसह लुंगी परिधान केली आहे आणि कमरेवर पंचा बांधला आहे. रश्मिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप भावतो आहे. 


रश्मिकाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत लखनऊमध्ये या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे.

सरीलेरू, नीकेवरू, गीता गोविंदम आणि डिअर कॉमरेडसोबत दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत उल्लेखनीय आणि अविस्मरणीय सादरीकरण केल्यानंतर आता रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: National Crush Rashmika Mandana seen plowing in the field, plowing video gets likes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.