बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह हिचा आज वाढदिवस असून ते ७० वर्षांचे झाले आहेत.नसीरुद्दीन यांनी वयाच्या विसाव्या वर्षी स्वतःपेक्षा पंधरा वर्षे मोठ्या मुलीसोबत प्रेम झाले होते आणि त्यानंतर त्यांनी लग्नदेखील केलं. त्यानंतर त्यांच्या घरात एका मुलीचा जन्मदेखील झाला. लग्नानंतर ते एका अभिनेत्रीसोबत बराच काळ लिव इन रिलेशनशीपमध्ये राहिले होते. ते बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहेत. त्यांच्या करियरमध्ये त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारापासून फिल्मफेयर पुरस्कार जिंकले आहेत. यासोबतच हिंदी सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री व पद्मभूषण अवॉर्डही प्रदान करण्यात आला आहे. 

नसीरुद्दीन शहा यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत त्यांनी निशांत, आक्रोश, स्पर्श, मिर्च मसाला, एलबर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, त्रिकाल, जुनून, मंडी, अर्ध सत्य, कथा व जाने भी दो यारो या चित्रपटात काम केलं आहे. १९८० साली हम पांच चित्रपटात काम केलं. त्यानंतर १९८२ साली त्यांनी दिल आखिर दिल है चित्रपटात काम केलं. या चित्रपटात त्यांच्यासोबत राखी दिसली होती.

त्यानंतर ते मासूम चित्रपटात दिसले. १९८६ साली नसीरुद्दीन शाह यांनी मल्टिस्टारर चित्रपट कर्ममध्ये दिसले होते. या चित्रपट दिलीप कुमारदेखील होते. याशिवाय त्यांनी गुलामी, त्रिदेव, विश्वात्मा व मोहरा चित्रपटात काम करत आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्सवर देखील काम केलं आहे. २००१ साली ते मॉन्सून वेडिंगमध्ये दिसले होते. याशिवाय त्यांनी पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे.


नसीरुद्दीन शाह यांना कमी वयात प्रेम झाले होते. त्यावेळी ते जवळपास १९ ते वीस वर्षांचे होते. त्यावेळी त्यांना मनारा सीकरी नामक ३६ वर्षीय महिलेशी प्रेम झाले होते. ज्यांना परवीन मुराद नावानं ओळखलं जातं. मनारा नसीरुद्दीन शाह यांच्यापेक्षा पंधरा वर्ष मोठी होती. जेव्हा शाह यांचं वय १९ ते वीस वर्ष होते त्यावेळी मनारा ३६ वर्षांची होती. वयात इतकं अंतर असतानाही दोघांनी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगी झाली. जिचं नाव हीबा शाह ठेवण्यात आलं.


एका मुलाखतीत शाह यांनी सांगितलं की, त्यांचा लग्नाची निर्णय चुकीचा होता. त्यांना मुलगी झाल्यानंतर ते पत्नीपासून व ६ महिन्यांच्या मुलीपासून वेगळे झाले. ती ८ वर्षांची होईपर्यंत ते तिला भेटले नाही. १९८२ साली मनारा यांचं निधन झालं.

७०च्या दशकात त्यांना अभिनेत्री रत्ना पाठक यांच्यासोबत प्रेम झालं. त्यांच्यासोबत ते बराच काळ लिव इन रिलेशनशीपमध्ये राहिले. शाह यांनी मनारा यांना घटस्फोट देऊन त्यांनी रत्ना पाठक यांच्यासोबत १९८२ साली लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर नसीरुद्दीन शाह यांना दोन मुलं झाली त्यांची नाव इमाद व विवान अशी आहेत.


Web Title: Naseeruddin Shah was married to a 15-year-old girl is today the husband of this actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.