पार्टी अन् मंत्री...! सुशांत प्रकरणात का आले अभिनेता डिनो मोरियाचे नाव?  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 11:24 AM2020-08-05T11:24:12+5:302020-08-05T11:25:35+5:30

आरोपांवर डिनो म्हणाला...

narayan rane takes dino moreas name in sushant singh rajputs death case | पार्टी अन् मंत्री...! सुशांत प्रकरणात का आले अभिनेता डिनो मोरियाचे नाव?  

पार्टी अन् मंत्री...! सुशांत प्रकरणात का आले अभिनेता डिनो मोरियाचे नाव?  

googlenewsNext
ठळक मुद्देमला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेता सूरज पांचोलीने दिली.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. काल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला होता. सुशांतची एक्स-मॅनेजर दिशा सालियन हिनेही आत्महत्या केली नसून तिचाही बलात्कार करून हत्या झाल्याचे त्यांनी म्हटले होते. केवळ इतकेच नाही तर या दोन्ही प्रकरणात त्यांनी अभिनेता सूरज पांचोली आणि अभिनेता डिनो मोरिया या दोघांचे नावे घेतली होती.

डिनो मोरियाच्या घरी मंत्री येतात. हे मंत्री का येतात आणि 3-4 तास काय करतात? असा आरोप करत राणे यांनी एक धक्कादायक खुलासा केला होता. 13 जूनला डिनो मोरियाच्या बंगल्यावर झालेल्या पार्टीत काही लोक एकत्र जमले होते. नंतर ते सुशांतच्या घरी गेले होते. या पार्टीत जे मंत्री उपस्थित होते, ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले नसतील का? त्यांची नावे का लपवली जात आहेत? असे सवाल राणे यांनी केले होते. त्यांच्या या आरोपानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.  

डिनो म्हणतो, माझ्या घरी कुठलीच पार्टी झाली नाही
राणेंच्या आरोपावर डिनोने स्पष्टीकरण दिले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत डिनोने सगळे आरोप फेटाळून लावलेत. 13 जूनला माझ्या घरी कुठलीही पार्टी झाली नाही. माझ्या घरी कोणीही आले नव्हते. मला याबद्दल आणखी काहीही बोलायचे नाही, असे डिनो म्हणाला.

सूरज पांचोली म्हणाला,
मला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेता सूरज पांचोलीने दिली.

Web Title: narayan rane takes dino moreas name in sushant singh rajputs death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.