Tanushree Dutta Controversy: नाना पाटेकर, गणेश आचार्य ‘या’ दिवशी देणार तनुश्रीच्या आरोपांना उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 11:52 AM2018-10-04T11:52:38+5:302018-10-04T11:53:46+5:30

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताचा वाद आता ख-या अर्थाने चव्हाट्यावर येणार आहे. 

Nana Patekar, Ganesh Acharya and Rakesh Sarang to address Tanushree Dutta's allegations on October 8 | Tanushree Dutta Controversy: नाना पाटेकर, गणेश आचार्य ‘या’ दिवशी देणार तनुश्रीच्या आरोपांना उत्तर!

Tanushree Dutta Controversy: नाना पाटेकर, गणेश आचार्य ‘या’ दिवशी देणार तनुश्रीच्या आरोपांना उत्तर!

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले. कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांनीही त्यांची साथ दिली, असा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताचा वाद आता ख-या अर्थाने चव्हाट्यावर येणार आहे. होय, येत्या ८ आॅक्टोबरला नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी असे सगळे एकत्र येत, तनुश्रीच्या आरोपांना मीडियासमक्ष उत्तर देणार आहेत.
या पत्रपरिषदेत नाना  पहिल्यांदा या प्रकरणाबद्दल जाहीररित्या आपली बाजू मांडताना दिसतील.
आज राकेश सारंग यांनी या पत्रपरिषदेबद्दल माहिती दिली.
अशा खोट्या आरोपांना काय उत्तर द्यावे, खरे तर हेच मला कळत नाहीये. मीडियात चर्चेत राहण्यासाठी काही लोक असले प्रकार करतात. तनुश्री दत्ताही त्यातलीच, असे राकेश सारंग म्हणाले.
२००८ मध्ये हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या एका विशेष गाण्याचं शुटिंग सुरु असताना नाना पाटेकर यांनी जबरदस्तीने मिठीत घेतल्याच्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपाने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे, दिवसागणिक या वादाला एक वेगळेच वळण मिळतेय. या वादात अनेकजण नाना पाटेकर यांची पाठराखण करणारे आहेत, तसेच तनुश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारेही आहेत. आता तर हा वाद केवळ बॉलिवूडमधील ‘कास्टिंग काऊच’पुरता मर्यादीत न राहता त्याला राजकीय रंग मिळू पाहतोय. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर झालेल्या घटनेनंतर नाना पाटेकर यांनी मनसेकडून आपल्याला धमकावले होते, या तनुश्रीच्या वादानंतर आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे, तनुश्री दत्ताला ‘बिग बॉस’च्या घरात पाठवाल तर आम्ही बिग बॉसचे घर उद्धवस्त करू, अशी धमकी मनसेने दिली आहे.

Web Title: Nana Patekar, Ganesh Acharya and Rakesh Sarang to address Tanushree Dutta's allegations on October 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.