मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवांवर व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 12:29 PM2019-05-04T12:29:23+5:302019-05-04T12:44:15+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचे मुंबईतल्या एक रुग्णालयात निधन झाल्याचे अफवा उडवल्या गेल्या होत्या. पत्रकार आणि ट्रेंड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी मुमताज यांचं निधन झाल्याचे ट्वीट केले होते.

Mumtaz is healthy daughter tanya after actress' death hoax | मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवांवर व्यक्त केली नाराजी

मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवांवर व्यक्त केली नाराजी

googlenewsNext
ठळक मुद्देमुमताज लंडनमध्ये ठणठणीत असल्याचे सांगण्यात आलेकोमल नाहटा यांनी आपलं ट्वीट टिलीट करत माफी मागितली.

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचे मुंबईतल्या एक रुग्णालयात निधन झाल्याचे अफवा उडवल्या गेल्या होत्या. पत्रकार आणि ट्रेंड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी मुमताज यांचं निधन झाल्याचे ट्वीट केले होते. यानंतर लोकांच्या यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. मात्र मुमताज यांच्या कुटुंबीयांनी याचं खंडन केले आहे. मुमताज लंडनमध्ये ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर कोमल नाहटा यांनी आपलं ट्वीट टिलीट करत माफी मागितली.  



मुमताज यांच्या कुटुंबीयांनी मीडिशी बोलताना सांगितले की, मुमताज यांची प्रकृती एकदम सुखरुप आहे.अशा प्रकारची खोटी माहिती का पसरवली जातेय हेच आम्हाला माहिती नाही. अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.  


मुमताज यांच्या निधनाची अफवा दुसऱ्यांदा पसरली आहे. निधनाच्या अफवांवर मुमताज यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. ‘मी सध्या लंडनमधल्या घरी असून इथे मी मजेत आहे. माझ्या निधनाच्या अफवांमुळे माझे चाहते निराश होत असतील. मलाही स्वत:विषयीच्या अशा चर्चा ऐकून वाईट वाटतं,’ असं त्या म्हणाल्या.




एक न्यूज चॉनलला दिलेल्या मुलाखतीक मुमताज म्हणाल्या, मला नाही माहिती माझ्याबद्दल अशा अफवा कोणी आणि का पसरवल्या ?, हे माझ्यासोबत पहिल्यांदा झाले नाही. काही महिन्यांपूर्वीसुद्धा माझ्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. सध्या मी माझ्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये आहे. 

Web Title: Mumtaz is healthy daughter tanya after actress' death hoax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumtazमुमताज