Aryan Khan Drugs Case: ‘स्टारपुत्र’ आर्यन खानला महागात पडली वकीलाची एक चूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 04:49 PM2021-10-17T16:49:37+5:302021-10-17T16:50:57+5:30

Mumbai Cruise Drugs Case, Aryan Khan: फरदीन खान तीन दिवसांत जामीनावर सुटला, आर्यनचा तुरुंगातील मुक्काम का वाढला? फरदीन खानच्या वकीलांनी सांगितलं नेमकं काय चुकलं...काय झाली चूक

Mumbai Cruise Drugs Case Lawyer Ayaz Khan on Aryan Khan’s case Fardeen Khan’s lawyer told where was the mistake made by Satish Manshinde | Aryan Khan Drugs Case: ‘स्टारपुत्र’ आर्यन खानला महागात पडली वकीलाची एक चूक!!

Aryan Khan Drugs Case: ‘स्टारपुत्र’ आर्यन खानला महागात पडली वकीलाची एक चूक!!

googlenewsNext
ठळक मुद्देआर्यन खान व फरदीनच्या खटल्याची तुलना करत तो कसा हाताळायला हवा होता याबाबत अयाज खान यांनी मत नोंदवलं.

‘स्टारपुत्र’ आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरण चांगलंच भोवलं. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यनला तुरूंगाची (Aryan Khan Drugs Case) हवा खावी लागली. अद्यापही तो तुरुंगात आहे. शाहरूख खान आणि गौरी खान आर्यनच्या जामीनासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. पण तूर्तास तरी आर्यनला जामीन मिळू शकलेला नाही. येत्या बुधवारी म्हणजे 20 तारखेला आर्यनच्या जामीनावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. याचदरम्यान आर्यनला त्याच्या वकीलाची एक चूक महागात पडल्याची चर्चा आहे. होय, कधीकाळी असाच ड्रग्ज प्रकरणात अडकलेला अभिनेता फरदीन खानच्या (Fardeen Khan)  वकीलांनी या चुकीवर नेमकं बोट ठेवलं आहे.
फरदीनची केस लढवणारे वकील अयाज खान ( Ayaz Khan) यांनी नुकतीच ई टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते आर्यन खान प्रकरणावर सविस्तर बोलले. 2001 साली फरदीन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. एनसीबीने त्याला मुंबईच्या जुहू भागात कोकेन खरेदी करताना पकडले होते. फरदीनची ही केस अयाज खान यांनी लढवली होती. तीन दिवसांत त्यांनी फरदीनला जामीन मिळवून दिला होता. मात्र आर्यन खानला अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. आर्यनच्या वकीलाकडून नेमकी काय चूक झाली, यावर अयाज खान बोलले.
आर्यन खान व फरदीनच्या खटल्याची तुलना करत तो कसा हाताळायला हवा होता याबाबत अयाज खान यांनी मत नोंदवलं.

नेमकी ही चूक नडली
आर्यन खान व फरदीन केसची तुलना करताना त्यांनी एक गोष्ट ठळकपणे नमूद केली, ती म्हणजे जामीन. ते म्हणाले, फरदीनच्या प्रकरणात आम्ही जामीनसाठी अतिशय वेगाने प्रयत्न केले होते. फरदीनला पहिल्याच दिवशी कोर्टात हजर केले गेले तेव्हाच मी जामीन अर्ज दाखल केला होता.  आम्ही जामीनासाठी अर्ज दिला आणि दुस-या दिवशी त्यावर सुनावणी झाली. एनसीबीने बाजू मांडली आणि आमचा युक्तिवाद केला आणि फरदीन जामीनावर सुटला. आर्यन प्रकरणात हे घडलं नाही.  आर्यन सहा दिवस एनसीबीच्या कोठडीत राहिला. यामुळे एनसीबीला त्यांचा तपास सुरू ठेवण्याची संधी मिळाली. त्यांना खूप वेळ मिळाला आणि आता आर्यन विदेशात असताना ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात असल्याचं एनसीबी सांगतेय.  
 सुरुवातीला आर्यनच्या विरोधात ड्रग्ज घेणारा म्हणून गुन्हा नोंदवला होता. त्यांनी आर्यनच्या विरोधात कलम  27, 28 आणि 29 लावले. कलम 27 हे ड्रग्जचा उपभोग घेणाºयाविरोधात, कलम 28  हे ड्रग्जचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याच्या विरोधात आणि कलम 29 हे ड्रग्जचा उपभोग घेण्यासाठीच्या कटात सहभागी होण्यासाठी आहे. परंतु या कलमांनुसार शिक्षा केवळ ड्रग्जचा उपभोग घेणाºया व्यक्तीलाच होऊ शकते.  एनसीबीला संधी मिळताच त्यांनी त्यांनी आर्यनचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट शोधले आणि इतकर काही गोष्टी देखील समोर आल्या. एनसीबीला आर्यनने काय जबाब दिला, त्याच्याकडून काय वदवून घेतलं, यावर आता ब-याच गोष्टी अवलंबून आहेत, असेही ते म्हणाले.  
 

Web Title: Mumbai Cruise Drugs Case Lawyer Ayaz Khan on Aryan Khan’s case Fardeen Khan’s lawyer told where was the mistake made by Satish Manshinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.