मुकेश खन्ना म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला पंडित नेहरूच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:37 PM2020-12-22T16:37:25+5:302020-12-22T16:38:41+5:30

मुकेश खन्ना यांनी युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाच्याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे.

mukesh khanna blames pandit jawaharlal nehru for todays's farmers condition | मुकेश खन्ना म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला पंडित नेहरूच जबाबदार

मुकेश खन्ना म्हणाले, शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला पंडित नेहरूच जबाबदार

googlenewsNext
ठळक मुद्देआपला देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरुंनी शहरीकरणाला प्राधान्य दिले. त्यांनी शहरीकरणाऐवजी खेड्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिले असते तर आज ही परिस्थिती निर्माणच झाली नसती.

प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना सध्या त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात त्यांनी आता एक विधान केले असून या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. एका युट्युबवरील व्हिडिओच्या माध्यमातून मुकेश खन्ना यांनी शेतकरी आंदोलनावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी शहरीकरणाला महत्त्व दिले नसते तर आज ही अवस्था झालेली नसते. गेल्या ७० वर्षांत देशात हेच सुरू आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

मुकेश खन्ना यांनी युट्यूबच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाच्याबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे की, मी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आणि त्या आजतागायत बदललेल्या नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती अनेक वर्षांपासून अतिशय वाईट आहे आणि त्यासाठी आपल्या देशाचे धारण कारणीभूत आहे. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरुंनी शहरीकरणाला प्राधान्य दिले. त्यांनी शहरीकरणाऐवजी खेड्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिले असते तर आज ही परिस्थिती निर्माणच झाली नसती. आपल्या देशात शहरांपेक्षा गावाचे प्रमाण अधिक आहे. खेड्यांची प्रगती झाली तर विकास होईल असे मला वाटते. माझे हे मत ऐकल्यावर मी भाजपाला पाठिंबा देतोय असे तुम्हाला वाटेल. पण असे काहीही नाही.

भारत हा कृषीप्रधान देश असताना कृषीविषयक विधेयके आणि नंतर त्याचे कायद्यात रुपांतर करताना देशभरातील शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य शेतकरी यांना विश्वासात घेण्यात आले नाही, हा प्रमुख आक्षेप आहे. लोकसभा आणि राज्यसभेत ही विधेयके ज्या पद्धतीने मांडण्यात आणि मंजूर करण्यात आली, त्यातील घिसाडघाई आक्षेपार्ह आहे. राज्यसभेत विरोधी पक्षांनी चर्चेऐवजी घातलेला गोंधळ सरकारच्या पथ्यावर पडला, असाही सूर व्यक्त होत आहे.

Web Title: mukesh khanna blames pandit jawaharlal nehru for todays's farmers condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.