सुशांत सिंग राजपूतचा दिल बेचारा सिनेमा शेवटचा ठरला. हा सिनेमा डिज्नी हॉटस्टारवर 24 जुलैला रिलीज होणार आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार सुशांतने हा सिनेमा स्क्रिप्ट वाचल्याशिवायच साईन केला होता. दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी या गोष्टीचा उलगडा केला आहे. एबीपी न्यूजशी बोलताना मुकेश म्हणाले, “सुशांतला माहित होते की, एक दिवस मला स्वत: चा चित्रपट बनवायचा आहे.  सुशांतने मला वचन दिले की ज्या दिवशी मी चित्रपट बनविण्याचा निर्णय घेईन, तो नक्कीच माझ्याबरोबर काम करेल.आमच्या दोघांमध्ये नेहमीच असा मजबूत भावनिक बंध होता."

कास्टिंग डायरेक्टर म्हणून मुकेश छाबडा यांनी  सुशांतला 'काय पोछे' सिनेमात कास्ट करुन बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला होता. यानंतर मुकेश छाबडा आणि सुशांतमध्ये चांगली मैत्री झाली. जेव्हा मुकेश छाबडा 'दिल बेचरा' साठी सुशांतकडे  तेव्हा त्याने स्क्रिप्ट न वाचताच होकार दिला. 

सुशांत सिंग राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट हॉलिवूडपट द फॉल्ट इन अवर स्टार्सचा रिमेक आहे. यात सुशांतच्या अपोझिट संजना सांघी दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला ए.आर रेहमानने संगीत दिले आहे आणि यातील गाणी अमिताभ भट्टाचार्यने लिहिले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mukesh chhabra reveals sushant singh rajput signs his last film dil bechara without reading the script

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.