​ही आहे, मुकेश अंबानी यांची सून श्लोका! आकाश अंबानी व श्लोकाच्या प्री- एगेंजमेंट सेरेमनीचे फोटो व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 06:24 AM2018-03-25T06:24:05+5:302018-03-25T11:54:05+5:30

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. लवकरच आकाश श्लोका मेहतासोबत साखरपुडा करणार आहे. ...

This is Mukesh Ambani's daughter Shloka! Akash Ambani and Shloka's Pre-Aggement Ceremonies Photo Viral !! | ​ही आहे, मुकेश अंबानी यांची सून श्लोका! आकाश अंबानी व श्लोकाच्या प्री- एगेंजमेंट सेरेमनीचे फोटो व्हायरल!!

​ही आहे, मुकेश अंबानी यांची सून श्लोका! आकाश अंबानी व श्लोकाच्या प्री- एगेंजमेंट सेरेमनीचे फोटो व्हायरल!!

googlenewsNext
केश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा जोरात आहे. लवकरच आकाश श्लोका मेहतासोबत साखरपुडा करणार आहे. त्यापूर्वी काल २४ मार्चला गोव्यात आकाश व श्लोका यांची प्री- एगेंजमेंट सेरेमनी झाली. दोघेही  याचवर्षी अखेरिसपर्यंत लग्नबंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लग्न मुंबईत होणार आहे.



तूर्तास आकाश व श्लोका यांच्या प्री-एजेंगमेंटचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी  आपल्या मुलांबद्दल मोकळेपणाने बोलल्या होत्या. आकाशच्या लग्नाबद्दलही त्या बोलल्या होत्या.



आम्ही आमच्या मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांना आपला लाईफ पार्टनर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझ्या मुलाला जेव्हाही ज्या कुण्या मुलीसोबत लग्न करावेसे वाटेल, आम्ही त्याच्या निर्णयाचे स्वागत करू, असे त्या म्हणाल्या होत्या.



कोण आहे श्लोका

आकाश व श्लोका यांनी धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी श्लोका विदेशात गेली. २००९ मध्ये अमेरिकास्थित न्यूजर्सी प्रिंसटन युनिव्हर्सिटीत तिने प्रवेश घेतला. पुढे द लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल सायन्समधून कायद्यात मास्टर्स केले.  यानंतर २०१४ मध्ये तिने रोसी ब्लू फाऊंडेशनमध्ये डायरेक्टर पद स्वीकारले. श्लोका कनेक्ट फॉर नामक संस्थेची को-फाऊंडरही आहे. ही संस्था एनजीओंची मदत करते. श्लोका मेहता ही हिºयांचे व्यापारी रसेल मेहता यांची सर्वात लहान मुलगी आहे.
a

Web Title: This is Mukesh Ambani's daughter Shloka! Akash Ambani and Shloka's Pre-Aggement Ceremonies Photo Viral !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.