‘बॉर्डर’ चित्रपटाने २३ वर्षांपूर्वी ओपनिंग डेच्या दिवशी कमावले होते एवढे कोटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:31 PM2020-06-14T18:31:21+5:302020-06-14T18:31:56+5:30

जेपी दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाला २३ वर्ष पूर्ण झाले असून या चित्रपटाने ओपनिंग डेच्या दिवशी किती कोटी रूपये कमावले होते? याची उत्सुकता तुम्हाला असेलच.

The movie 'Border' earned crores on the opening day 23 years ago ... | ‘बॉर्डर’ चित्रपटाने २३ वर्षांपूर्वी ओपनिंग डेच्या दिवशी कमावले होते एवढे कोटी...

‘बॉर्डर’ चित्रपटाने २३ वर्षांपूर्वी ओपनिंग डेच्या दिवशी कमावले होते एवढे कोटी...

googlenewsNext

 ‘संदेसे आते हैं हमें तडपाते हैं...’ हे गाणं ओठांवर आलं की, सहज नाव ओठी येते ते ‘बॉर्डर’ चित्रपटाचे. हिंदी चित्रपटसृष्टीतला हा चित्रपट प्रेक्षक कायम लक्षात ठेवतील. जेपी दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाला २३ वर्ष पूर्ण झाले असून या चित्रपटाने ओपनिंग डेच्या दिवशी किती कोटी रूपये कमावले होते? याची उत्सुकता तुम्हाला असेलच. आम्ही तुम्हाला सांगतो की, या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला ते...

‘बॉर्डर’ चित्रपटात दिग्गज अभिनेत्यांनी काम केले. हा चित्रपट म्हणजे एक माईलस्टोन होता. या चित्रपटात सर्वच कलाकारांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी त्यावेळी अक्षरश: डोक्यावर घेतले. बॉक्स ऑफिसचा गल्ला ओपनिंग डेच्या दिवशीच चक्क १ कोटी १० लाख एवढा भरला होता. सध्याच्या काळात १ कोटी म्हणजे खरंतर काहीच नाही. मात्र, त्यावेळी ही रक्कम खुप मोठी होती. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, या चित्रपटाची किती  क्रेझ प्रेक्षकांमध्ये होती. 

जेपी दत्ता यांच्या चित्रपटात कायमच खुप जास्त प्रमाणात स्टारकास्ट असतात. याशिवाय बॉर्डर चित्रपट काही वेगळा नव्हता. सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी यासारखी तगडी स्टारकास्ट मंडळी यात होती. शिवाय गाणीही सुंदर होती. या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले होते. तसेच सुदेश बेरी याने नायब सुभेदार मथुरादास याची भूमिका केली होती. या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. 

Web Title: The movie 'Border' earned crores on the opening day 23 years ago ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.