अभिनेत्रीने कोरोना काळात गुपचूप उरकले लग्न ? नववधू रुपातील फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:19 PM2021-05-27T12:19:56+5:302021-05-27T12:27:27+5:30

मध्यंतरी मौनी रॉयने हातात अंगठी असलेला फोटो शेअर केला होता. अंगठी पाहून तिच्या साखरपुड्याच्याही वावड्या उठल्या होत्या.अनेकांनी तिला साखरपुडा झाला का असे प्रश्न विचारले होते.

Mouni Roy's Secretly Married With Duabi Based banker, Flaunts Her Bridal Look | अभिनेत्रीने कोरोना काळात गुपचूप उरकले लग्न ? नववधू रुपातील फोटो झाले व्हायरल

अभिनेत्रीने कोरोना काळात गुपचूप उरकले लग्न ? नववधू रुपातील फोटो झाले व्हायरल

googlenewsNext

लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले आहेत. अशात आता आणखी एक अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर आला आहे. नववधूप्रमाणे नटलेले फोटो आणि व्हिडीओ पाहून तिनेदखील तिचे लग्न उरकल्याचे बोलले जात आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मौनी रॉय. 

नववधू अंदाजातील लूक कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या मौनीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. लेंहग्यामध्ये मौनीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. मौनीचा हा नववधू किंवा ब्रायडल लूक पाहून रसिकांध्ये तिच्या लग्नाची कुजबूज सुरु झाली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांशी संवाद साधत असते. यानिमित्ताने आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूकवरही चाहते फिदा होतात. जगभरात आज मौनीचादेखील मोठा चाहता वर्ग आहे. मौनीसह लग्न करण्याची इच्छा बाळगणा-या तिच्या चाहत्यांसाठी मात्र लग्नाची बातमी नक्कीच हार्टब्रेक करणारी ठरेल. 

तुर्तास मौनीने खरंच लग्न केले आहे की नाही यावर अजून तरी तिने यावर काही सांगितलेले नाही. तर दुसरीकेड ब्रायडल फोटोशूटदरम्यानचा मौनीचा ब्रायडल लूक असावा असेही बोलले जात आहे. 

मध्यंतरी मौनी रॉयने हातात अंगठी असलेला फोटो शेअर केला होता. अंगठी पाहून तिच्या साखरपुड्याच्याही वावड्या उठल्या होत्या.अनेकांनी तिला साखरपुडा झाला का असे प्रश्न विचारले होते.

छोट्या पडद्यावरील नागिन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावत आहे. २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने ‘गोल्ड’या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातही तिची खास भूमिक आहे. 

सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहता हॉटनेसच्या बाबतीत मौनी रॉय बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. मौनी तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. अभिनयासोबतच ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. तिचे काही डान्स व्हिडिओसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतात.

Web Title: Mouni Roy's Secretly Married With Duabi Based banker, Flaunts Her Bridal Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.