ठळक मुद्दे2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली.

बॉलिवूडची नव्या वर्षाची सुरुवात काही गोड बातम्यांनी झाली नाही. नुकतीच अनुष्का शर्मा आई झाली.  वरूण धवन व नताशा दलाल लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आली. आता अभिनेत्री मौनी रॉय हिच्याही लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. होय, टीव्ही आणि बॉलिवूडची अभिनेत्री मैनी रॉय दुबईतल्या एका बँकरसोबत लवकरच लग्न करू शकते, असे मानले जात आहे.


टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मौनी सध्या दुबईस्थित बँकर सूरज नांबियारला डेट करतेय आणि लवकरच त्याच्याशी लग्नगाठ बांधू शकते. लॉकडॉऊनच्या काळात मौनी अनेक महिने दुबईत होती. दुबईत मौनीची बहीण आपल्या पती व मुलांसोबत राहते. याचठिकाणी तिची सूरजसोबत ओळख झाली.

मौनी सूरजसोबत कधी लग्न करणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मौनीने आधीच आपले रिलेशनशिप इंन्स्टाग्रामवर ऑफिशिअल केले आहे. मौनीने मध्यंतरी सूरजसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र नंतर हा फोटो डिलीटही केला होता.  

इतकेच नाही तर मोनीने सूरज आणि त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यात तिने सूरजच्या आईवडिलांना मॉम व डॅड म्हटले होते. मौनीच्या एका जवळच्या व्यक्तिने दिलेल्या माहितीनुसार, मौनी सूरजच्या कुटुंबाच्या खूप जवळ आली आहे. त्याच्या पालकांसोबत तिची चांगलीच गट्टी जमलीये. सूरजसोबत लग्न करण्याच्या निर्णयामागे हेही एक कारण आहे.
तशी सूरज नांबियारसोबतच्या मौनीच्या डेटींगच्या बातम्या ऑगस्ट 2020 मध्येच कानावर आल्या होत्या. सूरज राहतो, त्याच बिल्डिंगमध्ये तिने शूटींगही केले होते.  

मौनीला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. शालेय शिक्षण मौनीने पश्चिम बंगालमधून घेतले. यानंतर तिने दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केले. मौनीच्या चाहत्यांना वाट तिने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली मात्र असे नाही आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा  रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती. 

एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेत दिसली होती.   यानंतर मौनी  'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेंमध्ये दिसली होती. 2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mouni roy reportedly to marry dubai based banker suraj nambiar soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.