नोरा फतेहीचा डान्स पाहून आईने मारुन फेकली चप्पल, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 12:23 PM2021-02-02T12:23:58+5:302021-02-02T12:24:34+5:30

डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भूरळ पाडणारा आहे.

Mother throws sandals after watching Nora Fatehi Super Sexy Dance, video goes viral | नोरा फतेहीचा डान्स पाहून आईने मारुन फेकली चप्पल, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

नोरा फतेहीचा डान्स पाहून आईने मारुन फेकली चप्पल, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

googlenewsNext

बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. पुन्हा एकदा तिच्या एक व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. समोर आलेला हा व्हिडीओ तिचा डान्सचा आहे. व्हिडीओला प्रचंड पसंती मिळत आहे.  तिच्या  डान्स स्टेप्स पाहून तुम्हाला याड लागेल अशाच तिच्या अदा  आहेत. डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भूरळ पाडणारा आहे.


नोरा फतेहीने जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात दिलबर हे आयटम साँग करून बॉलिवुडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने डांस शोमध्येही भाग घेतला होता. याशिवाय ‘स्त्री’ सिनेमातील ‘कमरिया’ आणि जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’ सिनेमात ‘ओ साकी साकी’ या हिट गाण्यांमध्ये तिने रसिकांची मनं जिंकली होतीय

घरातही नोरा डान्स करत स्वतःला बिझी ठेवते. मात्र आईने जेव्हा नोराला असा डान्स करताना पाहिला तेव्हा थेट चप्पलच मारुन फेकल्याचे पाहायला मिळेल. इथे लोक कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहेत आणि तुला अशा काळातही डान्सशिवाय दुसरे काहीही सुचत नाही असेही बोलताना दिसत आहे. नोराच्या या व्हिडीओला चाहत्यांची तुफान पसंती मिळत आहे. व्हिडीओ मजेशीर असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


अलीकडे नोरा करिना कपूर हिच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या टॉक शोमध्ये सहभागी झाली. यावेळी करिनासमोरच नोराने ही इच्छा व्यक्त केली. तैमूर तुझ्या डान्स मुव्हचा दिवाना आहे, असे करिनाने नोराला सांगितले. यावर नोराने थेट तैमूरसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. ‘तैमूर लवकर मोठा होईल, अशी आशा करते. तो मोठा झाला की मी त्याच्यासोबत साखरपुडा व नंतर लग्नाबद्दल विचार करू शकते,’असे नोरा म्हणाली. नोराचे हे शब्द ऐकून करिनाला हसू आवरले नाही. तैमूर आता फक्त 4 वर्षांचा आहे, त्याच्या लग्नाला आता बराच वेळ आहे, असे ती हसत हसत म्हणाली. यावर ‘काही हरकत नाही, मी वाट पाहीन,’ असे नोरा म्हणाली होती.

Web Title: Mother throws sandals after watching Nora Fatehi Super Sexy Dance, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.