मोहनिश बहल या गोष्टीला कंटाळून सोडणार होता इंडस्ट्री, त्यानेच दिली कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 02:40 PM2021-01-04T14:40:26+5:302021-01-04T14:45:35+5:30

मोहनिश बहलने चित्रपटसृष्टी सोडून पायलट बनण्याचे ठरवले होते.

Mohnish Bahl thought his career was finished before Maine Pyaar Kiya | मोहनिश बहल या गोष्टीला कंटाळून सोडणार होता इंडस्ट्री, त्यानेच दिली कबुली

मोहनिश बहल या गोष्टीला कंटाळून सोडणार होता इंडस्ट्री, त्यानेच दिली कबुली

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान मैंने प्यार किया या चित्रपटात काम करणार होता. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याने बडजात्या कुटुंबियांला मोहनिशचे नाव सुचवले आणि या चित्रपटामुळे त्याच्या करियरला एक दिशा मिळाली.

मोहनिश बहल हा अभिनेत्री नुतन यांचा मुलगा असून तो गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. मोहनिशने मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है, जय हो, पानिपत यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तो नुकताच संजीवनी २ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. मोहनिश बहलविषयी तुम्हाला एक खास गोष्ट माहीत आहे का, मोहनिश बहलने चित्रपटसृष्टी सोडून पायलट बनण्याचे ठरवले होते. पण सलमान खानमुळे त्याचे आयुष्य बदलले.

मोहनिशने बेकरार या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. तो या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतरच्या त्याच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपयश मिळाले. चित्रपटसृष्टीत अपयश पदरी पडल्यानंतर चित्रपटसृष्टी सोडून पायलट बनायचे असे मोहनिशने ठरवले होते. पण सलमान खानमुळे त्याने हा निर्णय बदलला. सलमान मैंने प्यार किया या चित्रपटात काम करणार होता. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याने बडजात्या कुटुंबियांला मोहनिशचे नाव सुचवले आणि या चित्रपटामुळे त्याच्या करियरला एक दिशा मिळाली. 

मैंने प्यार किया या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी मोहनिशचे नाव सलमाननेच सुचवले होते. त्याने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, राज बाबू (राजकुमार बडजात्या) यांनी मला या चित्रपटासाठी साईन केल्यानंतर या चित्रपटात एका नकारात्मक भूमिकेसाठी ते एका कलाकाराच्या शोधात आहे हे मला कळले. त्यावर मी मोहनिशचे नाव त्यांना सुचवले होते. मोहनिशची आई प्रसिद्ध अभिनेत्री नुतन या असल्याने मोहनिशला नकारात्मक भूमिका मी कशी देऊ असा प्रश्न राज बाबू यांना पडला होता. त्यावेळी मी नूतनजी यांना भेटलो आणि त्यांनी राज बाबू यांना भेटून मोहनिश ही भूमिका करेल असे सांगितले.

मैंने प्यार कियामध्ये मोहनिशने रंगवलेला खलनायक प्रेक्षकांना प्रचंड आवडला. या चित्रपटानंतर राजश्री प्रोडक्शनच्या हम आपके है कौन या सुपरहिट चित्रपटामध्ये त्याने खूप चांगली भूमिका साकारली. 

Web Title: Mohnish Bahl thought his career was finished before Maine Pyaar Kiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.