आदित्य रॉय कपूरला मोहित सूरीचा आधार...! पुन्हा एकदा होणार धमाका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:00 AM2019-01-29T06:00:00+5:302019-02-26T11:45:34+5:30

टीव्हीवर व्हिजे म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारा आणि पुढे ‘लंडन ड्रिम्स’ या चित्रपटातून सहायक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारा अभिनेता आदित्य रॉय कपूरचे करिअर सध्या गटांगळ्या घाताना दिसतेय.

mohit suris next film featuring aditya roy kapur and disha patani | आदित्य रॉय कपूरला मोहित सूरीचा आधार...! पुन्हा एकदा होणार धमाका!!

आदित्य रॉय कपूरला मोहित सूरीचा आधार...! पुन्हा एकदा होणार धमाका!!

googlenewsNext
ठळक मुद्देमोहित सूरीच्याच ‘आशिकी 2’ने आदित्यला नवी ओळख दिली होती. आता मोहित सूरी हाच पुन्हा एकदा आदित्यच्या करिअरची बुडती नौका वाचवणार असे दिसतेय.

टीव्हीवर व्हिजे म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारा आणि पुढे ‘लंडन ड्रिम्स’ या चित्रपटातून सहायक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारा अभिनेता आदित्य रॉय कपूरचे करिअर सध्या गटांगळ्या घाताना दिसतेय. म्हणायला, आदित्यने आपल्या करिअरमध्ये ‘आशिकी 2’ सारखा सुपरडुपर हिट चित्रपट दिलाय. पण या चित्रपटानंतर आदित्यच्या करिअरला गती येईल, असे वाटले असताना झाले उलटेच. यानंतर आदित्य एकाही चित्रपटात लीड रोलमध्ये दिसला नाही. पुढे तर पुन्हा एकदा  साईड रोल स्वीकारण्याची वेळ त्याच्यावर आली. अर्थात आता एक नवी संधी आदित्यपुढे चालून आली आहे. होय, मोहित सूरीच्या नव्या चित्रपटात आदित्यची वर्णी लागली आहे.  


अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण सूत्रांचे खरे मानाल तर आदित्यचे नाव फायनल आहे.  या चित्रपटात आदित्य लीड रोलमध्ये दिसेल. शिवाय त्याच्या अपोझिट दिशा पटानी मेन फिमेल लीडमध्ये असेल. आदित्य व दिशा कपलची भूमिका साकारतील. चित्रपटात एकूण चार मुख्य पात्र असतील.  


एकंदर काय तर मोहित सूरीच्याच ‘आशिकी 2’ने आदित्यला नवी ओळख दिली होती. आता मोहित सूरी हाच पुन्हा एकदा आदित्यच्या करिअरची बुडती नौका वाचवणार असे दिसतेय.
आदित्य तूर्तास ‘कलंक’ या चित्रपटात बिझी आहे. आलिया भट्ट व वरूण धवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. दिशाचे म्हणाल तर ती ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे.

Web Title: mohit suris next film featuring aditya roy kapur and disha patani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.