कतरिना, सोनाक्षीनंतर सलमान खानला मिळाली नवी हिरोईन ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:11 PM2020-02-13T17:11:46+5:302020-02-13T17:12:46+5:30

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आजपर्यंत अनेकांचे करिअर घडवले आहे.

Model larissa bonesi share her picture with salman khan | कतरिना, सोनाक्षीनंतर सलमान खानला मिळाली नवी हिरोईन ?

कतरिना, सोनाक्षीनंतर सलमान खानला मिळाली नवी हिरोईन ?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने आजपर्यंत अनेकांचे करिअर घडवले आहे. लवकरच सलमान आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये लेरीसा बाँझीसोबत काम करताना दिसणार आहे. 

लेरीसा बाँझी एक ब्राझिलियन मॉडेल आणि डान्सर आहे. लेरिसाने बिटाऊन आपले पहिले बॉलीवूड प्रोजेक्ट "सुभा होने ना दे" या गण्यामध्ये अक्षय कुमार' आणि जॉन इब्राहिमसोबत थिरकताना दिसली होती. लेरीसाने टायगर श्रॉफ आणि सूरज पांचोलीसोबत सुद्धा म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. लेरीसाने बॉलिवूडमध्ये 'सैफ अली खान' सोबत "गो गोआ गॉन" या चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. 

लेरीसा लवकरच पंजाबी सुपरस्टार 'गुरु रंधावा' आणि जे शॉन' सोबत "सुरमा सुरमा" या म्युझिक व्हिडिओमध्ये सुद्धा आपला जलावा दाखवताना दिसणार आहे. लारिसाने आपल्या इन्स्टाग्रामवर सलमानसोबतचा फोटो शेअर केला आहे. यावरुन अंदाज लावता येतो की सलमान लवकरच तिला लाँच करणार आहे.  

नुकतीच 'कभी ईद कभी दिवाली' या सलमानच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. यात सलमान खानसोबत अभिनेेत्री पूजा हेगडेची या चित्रपटात वर्णी लागली आहे. पूजा या चित्रपटात सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटात पूजा हेगडे सलमान खानच्या प्रेयसीची भूमिका करताना दिसणार आहे. पूजाबद्दल सांगताना निर्माता व लेखक साजिद नाडियादवाला म्हणाला की, 'हाऊसफुल ४'मध्ये पूजासोबत काम केल्यानंतर, आम्हाला हे जाणवले की ती या चित्रपटासाठी एकदम परफेक्ट आहे आणि सलमानसोबत तिची जोडी चांगली वाटेल. या कथेत नावीण्य आणेल.”

Web Title: Model larissa bonesi share her picture with salman khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.