KRK अडचणीत! फिटनेस मॉडेलने केला बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 02:49 PM2021-07-27T14:49:05+5:302021-07-27T14:51:39+5:30

केआरके सतत चर्चेत असतो तो त्याच्या वादग्रस्त टि्वटमुळे. केआरके अनेकांशी पंगा घेतो. बड्या बड्यांशी पंगा घेणारा हाच केआरके आता मात्र चांगलाच अडचणीत आला आहे.

Model accuses KRK aka kamaal r khan of molestation FIR registered in Mumbai | KRK अडचणीत! फिटनेस मॉडेलने केला बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

KRK अडचणीत! फिटनेस मॉडेलने केला बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्दे अलीकडे केआरकेने भाईजान सलमान खानसोबत पंगा घेतला होता. ‘राधे’चा अतिशय खराब रिव्ह्यू देऊन त्याने सलमानला डिवचले होते.

बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर. खान (Kamal Rashid Khan) अर्थात केआरके (KRK) सतत चर्चेत असतो तो त्याच्या वादग्रस्त टि्वटमुळे. केआरके अनेकांशी पंगा घेतो.   बड्या बड्यांशी पंगा घेणारा हाच केआरके आता मात्र चांगलाच अडचणीत आला आहे. एका मॉडेलने त्याच्यावर चक्क बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला असून त्याच्याविरूद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मॉडेलने गेल्या जून महिन्यातच पोलिसात तक्रार दिली होती. मुंबईच्या  वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये 26 जून 2021 रोजी केआरकेविरूद्ध एफआयआर दखल करण्यात आला.  

या एफआयआरची कॉपी सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. केआरके सध्या दुबईमध्ये आहे. त्याने अद्याप या प्रकरणावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.  
 अलीकडे केआरकेने भाईजान सलमान खानसोबत पंगा घेतला होता. ‘राधे’चा अतिशय खराब रिव्ह्यू देऊन त्याने सलमानला डिवचले होते. यानंतर काही दिवसांत सलमानने केआरकेवर मानहानी दावा ठोकला होता. ‘

राधे’चा खराब रिव्ह्यू दिल्यामुळे सलमानने आपल्यावर मानहानीचा दावा ठोकल्याचे केआरकेने म्हटले होते. मात्र सलमानच्या वकीलांनी  याबाबत खुलासा करत, मानहानीचा दावा व राधेच्या रिव्ह्यूचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.   केआरके सलमानच्या बीइंग ह्युमन ब्रँडला सतत बदनाम करण्याचे प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याच्याविरोधात मानहानी दावा ठोकण्यात आल्याचे वकीलाने स्पष्ट केले होते.
काही दिवसांपूर्वी केआरके पॉझिटिव्ह रिव्ह्यूसाठी 25 लाखांची मागणी करत असतानाची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे इंडस्ट्रीमधील कलाकारांना तो ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते.  

Web Title: Model accuses KRK aka kamaal r khan of molestation FIR registered in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.