मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी बनणार ‘बॅड बॉय’! पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:59 PM2019-05-24T12:59:59+5:302019-05-24T13:00:35+5:30

‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह बॉलिवूडमध्ये टिकू शकला नाही. तो अनेक चित्रपटांत दिसला. पण त्याचा कुठलाही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.आता मिथुन यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती बालिवूडममध्ये नशीब आजमावणार आहे.

mithun chakraborty son namashi chakraborty ready to debut with bad boy |   मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी बनणार ‘बॅड बॉय’! पाहा फोटो!!

  मिथुन चक्रवर्ती यांचा लहान मुलगा नमाशी बनणार ‘बॅड बॉय’! पाहा फोटो!!

googlenewsNext
ठळक मुद्देनमाशीला या चित्रपटासाठी साईन केले गेले तेव्हा मिथून अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांना ही गोड बातमी मिळाली.

‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचा मोठा मुलगा मिमोह बॉलिवूडमध्ये टिकू शकला नाही. तो अनेक चित्रपटांत दिसला. पण त्याचा कुठलाही चित्रपट कमाल दाखवू शकला नाही.आता मिथुन यांचा लहान मुलगा नमाशी चक्रवर्ती बालिवूडममध्ये नशीब आजमावणार आहे. होय, ‘बॅड बॉय’ या चित्रपटातून नमाशीचा डेब्यू होतोय. साजिद कुरैशी यांची मुलगी आमरीन कुरैशी यात हिरोईन असणार आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत.




राजकुमार संतोषी यांनी अंदाज अपना अपना, घायल, दामिनी, घातक, अजब प्रेम की गजब कहानी असे हिट चित्रपट दिले आहेत. अशात राजकुमार संतोषीसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या चित्रपटातून   डेब्यू होतोय म्हटल्यावर नमाशी सध्या खूश आहे. अर्थात ही संधी त्याला सहज मिळाली नाही. यासाठी त्याला अनेकदा आॅडिशन द्यावे लागले. तेव्हा कुठे त्याची निवड झाली.


बेंगळुरात चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे. मुंबईतही या चित्रपटाचे शूटींग होणार आहे. याशिवाय चित्रपटाची काही गाणी विदेशात शूट केली जाणार आहेत.


नमाशीला या चित्रपटासाठी साईन केले गेले तेव्हा मिथून अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांना ही गोड बातमी मिळाली. अमेरिकेतून मुंबईत परतल्यावर त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. नमाशीने हा चित्रपट साईन केला तेव्हा मी अमेरिकेत होतो. मी भारतात परतल्यावर मेकर्सनी मला कथेबद्दल सांगितले. राजकुमार संतोषी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. राजकुमार संतोषी मुलाला लॉन्च करणार असतील, तर कुठल्याही पित्याला आनंदच होईल. माझा मुलगा सुरक्षित हातात आहे, याचे मला समाधान आहे, असे मिथुन यांनी सांगितले.

Web Title: mithun chakraborty son namashi chakraborty ready to debut with bad boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.