Mithun Chakraborty had raised Ragini from the hands of Sridevi! | मिथुन चक्रवर्तीने वैतागून श्रीदेवीच्या हातून बांधून घेतली होती राखी !!
मिथुन चक्रवर्तीने वैतागून श्रीदेवीच्या हातून बांधून घेतली होती राखी !!
आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री श्रीदेवी हिचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी निगडित एक महत्त्वपूर्ण किस्सा सांगणार आहोत. अर्थातच हा किस्सा अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्याशी निगडित आहे. मिथुन आणि श्रीदेवी यांचे एकेकाळी अफेअर होते, त्यावेळी ते सर्वात जास्त गाजलेही होते. त्याच अनुषंगाने हा किस्सा आहे. परंतु हा सांगण्याअगोदर अभिनेत्री श्रीदेवीला ‘सीएनएक्स मस्ती’कडून वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.

श्रीदेवीने आज ५५ वा वाढदिवस साजरा केला. वयाच्या चौथ्या वर्षी साउथ चित्रपटांमध्ये एंट्री करणाºया श्रीदेवीने मल्याळम, तामिळ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट केले. त्याचबरोबर कित्येक अवॉर्ड्सवर आपले नावही कोरले. सध्या श्रीदेवी तिच्या वैवाहिक जीवनात खूश आहे. श्रीदेवीला दोन मुली असून, तिची मोठी मुलगी जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. श्रीदेवीने तिच्यापेक्षा वयाने ८ वर्ष मोठ्या बोनी कपूर यांच्याशी विवाह केला. परंतु श्रीदेवीला बोनी कपूर यांच्याबरोबर नव्हे तर बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत लग्न करायचे होते. त्याकाळी श्रीदेवी मिथुन यांच्यावर प्रचंड प्रेम करीत होती. जर मिथुन त्यावेळी विवाहित नसते तर आज मिथुन-श्रीदेवी ही जोडी आपल्याला रिअल लाइफमध्ये बघावयास मिळाली असती. डिस्को डान्सर मिथुन आणि श्रीदेवीची भेट ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांना प्रपोजही केले होते. यावेळी दोघांनी एकत्र राहण्याचे एकमेकांना वचनही दिले होते; मात्र त्यांचे हे वचन फार काळ टिकले नाही. कारण श्रीदेवीच्या प्रेमात पडण्याअगोदरच मिथुन विवाहित होते. शिवाय त्याच्या पत्नीला सोडण्यास ते तयार नव्हते. अशात त्यांना श्रीदेवीला आपल्या आयुष्यातून दूर करावे लागले. 

असे म्हटले जात आहे की, मिथुन आणि श्रीदेवीने मंदिरात गुपचूप लग्न केले होते. जेव्हा ही बातमी मिथुनदाची पत्नी योगीता यांना कळाली तेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. पुढे याच कारणामुळे श्रीदेवीने मिथुनबरोबरचे नाते तोडले. परंतु श्रीदेवीला आपले प्रेम विसरणे एवढ्या सहजासहजी शक्य नव्हते. अशात एकदा मिथुनदाने श्रीदेवीला आपल्यापासून दूर करण्यासाठी बोनी कपूरच्या समोर जाणूनबुजून श्रीदेवीच्या हातून राखी बांधून घेतली होती. मिथुनच्या अशा वागण्यामुळे श्रीदेवीला मात्र खूप धक्का बसला होता. तिला खूप अस्वस्थ वाटत होते, अशात ती अमेरिकेला निघून गेली. याचदरम्यान श्रीदेवीच्या आईची तब्येत बिघडली, त्यावेळी बोनी कपूर यांनी त्यांना खूप मदत केली. पुढे श्रीदेवीच्या मनातही बोनी यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले. खरं तर बोनी यांना श्रीदेवीबरोबर सुरुवातीपासूनच लग्न करायचे होते, परंतु श्रीदेवीचे मिथुन चक्रवर्ती यांच्यावर प्रेम होते. अखेर बोनीही श्रीदेवीच्या मनात प्रेमांकुर फुलविण्यात यशस्वी झाले. पुढे या दोघांनी लग्न केले. 
Web Title: Mithun Chakraborty had raised Ragini from the hands of Sridevi!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.