ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग दिसतेय मिथिला पालकर, फोटो बघून चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 03:28 PM2021-03-12T15:28:21+5:302021-03-12T15:30:31+5:30

मिथिला नुकतीच रेणूका शहाणेच्या त्रिभंगा या चित्रपटात झळकली होती.

Mithila palkar looks very stunning in a black dress | ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग दिसतेय मिथिला पालकर, फोटो बघून चाहते झाले फिदा

ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग दिसतेय मिथिला पालकर, फोटो बघून चाहते झाले फिदा

googlenewsNext

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्याने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.

मिथिला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच तिने तिचा ब्लॅक कलरच्या शॉर्ट वनपीसमधला  फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला  आहे. ब्लॅक वनपीसमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसतेय. काही वेळातच तिचा हा फोटो व्हायरल झाला आहे. चाहते यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतायेत.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर मिथिला नुकतीच रेणूका शहाणेच्या त्रिभंगा या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून मितालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटाद्वारे तिने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली होती. 

Web Title: Mithila palkar looks very stunning in a black dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.