ठळक मुद्देशाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे अरेंज मॅरेज. ७ जुलै २०१५ ला रोजी शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते.

सन 2015 मध्ये अभिनेता शाहिद कपूरने स्वत:पेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर शाहिद व मीरा यांना मीशा व झेन अशी दोन मुलेही झालीत. पण येत्या काळात शाहिद कपूर पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. होय, शाहिद कपूर पुन्हा एकदा लग्न करणार आहे. खुद्द शाहिदची पत्नी मीरा हिनेच हा खुलासा केला. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. आता शाहिद मीराला सोडून कुणासोबत लग्न करणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर शाहिदच्या या होणा-या पत्नीचे नाव आहे मीरा. होय, पत्नी मीरा राजपूत हिच्याचसोबत शाहिद दुस-यांदा लग्न करणार आहे. हे लग्न कधी होणार, कसे होणार, हे आम्हाला ठाऊक नाही. पण होणार हे मात्र नक्की.

एका ताज्या मुलाखतीत खुद्द मीराने ही माहिती दिली. विवाहसोहळ्याचे क्षण आम्हाला पुन्हा एकदा अनुभवायचे आहेत. नात्याची नवी बाजू, या नात्याचे अनेक पैलू नव्याने उलगडले जावेत, म्हणून आम्ही दोघांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला शाहिदने तसे वचनही दिले आहे, असे मीराने या मुलाखतीत सांगितले.

शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे अरेंज मॅरेज. ७ जुलै २०१५ ला रोजी शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.

आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. लग्नानंतर मीरा दोन मुलांची आई बनली आहे.आई बनल्यानंतर घर आणि मुले हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय.  


Web Title: Mira Rajput on renewing wedding vows with Shahid Kapoor: He’s promised me we’re going to do it again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.