हा काढा घेऊन मिलिंद सोमणने केली कोरोनावर मात, वाचा या काढ्याची रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 02:20 PM2021-04-06T14:20:07+5:302021-04-06T14:21:51+5:30

मिलिंदने या पोस्टमध्ये एका काढ्याची रेसिपी देखील दिली आहे. हा काढा मी पित होतो असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Milind Soman shares a picture wife Ankita Konwar as he tests negative for Covid-19; pens a thank you note for his fans | हा काढा घेऊन मिलिंद सोमणने केली कोरोनावर मात, वाचा या काढ्याची रेसिपी

हा काढा घेऊन मिलिंद सोमणने केली कोरोनावर मात, वाचा या काढ्याची रेसिपी

googlenewsNext
ठळक मुद्देया पोस्टमध्ये मिलिंदने एका काढ्याची रेसिपी देखील दिली आहे. हा काढा मी पित होतो असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, क्वारंटाइनच्या काळात मी कोणता काढा घेतला असे मला अनेकांनी विचारले. त्यामुळे मी ही रेसिपी येथे सांगत आहे

मिलिंद सोमणला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले होते. आता त्याने सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर करत कोरोनावर मात केली असल्याचे सांगितले आहे.

मिलिंदने सोशल मीडियावर त्याची पत्नी अंकितासोबतचा फोटो नुकताच पोस्ट केला आहे आणि त्यासोबत लिहिले आहे की, माझा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असल्याने माझा क्वांरंटाईनचा कालावधी संपला आहे. मी लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना केल्या होत्या, यासाठी मी तुमचे आभार मानतो. अंकिता तू माझी चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच गुवाहाटीवरून आलीस आणि माझी काळजी घेतली, त्यासाठी तुझे आभार....

या पोस्टमध्ये मिलिंदने एका काढ्याची रेसिपी देखील दिली आहे. हा काढा मी पित होतो असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, क्वारंटाइनच्या काळात मी कोणता काढा घेतला असे मला अनेकांनी विचारले. त्यामुळे मी ही रेसिपी येथे सांगत आहे. मी कोथिंबीर, मेथीचे दाणे, काळी मिरी, तुळस, आलं आणि गूळ याचा काढा घेतला होता. पहिल्या आठवड्यामध्ये मला कोणत्याही गोष्टीचा वास येत नव्हता. या व्यतिरिक्त मला कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐका...

तसेच या पोस्टद्वारे मिलिंदने त्याच्या डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत. 

Web Title: Milind Soman shares a picture wife Ankita Konwar as he tests negative for Covid-19; pens a thank you note for his fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.