'लक्ष्मी' नंतर थर्ड जेंडरवर येणार आणखी एक सिनेमा 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, पहिला लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 12:07 PM2020-11-10T12:07:12+5:302020-11-10T12:07:59+5:30

अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट सोमवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी तुफान पब्लिसिटी मिळवली होती.

Milind Soman Lady Look Viral On Social Media After Akshay kumar Laxmii Release | 'लक्ष्मी' नंतर थर्ड जेंडरवर येणार आणखी एक सिनेमा 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, पहिला लूक आला समोर

'लक्ष्मी' नंतर थर्ड जेंडरवर येणार आणखी एक सिनेमा 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, पहिला लूक आला समोर

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण त्याच्या बीचवरील न्युड रन फोटोंमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा मिलिंद सोमणने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट सोमवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी तुफान पब्लिसिटी मिळवली होती.'लक्ष्मी' चित्रपटाच्या विषयाप्रमाणेच   मिलिंद सोमणनेही एक चित्रपटा बनवणार असल्याची घोषणा केली आहे. याविषयी एक ट्विट करून मिलिंदने चाहत्यांना याचे संकेत दिले आहेत. या प्रोजेक्टसाठी  तो खूप उत्साही आहे.


मिलिंदने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.  ज्यात तो एका महिलेच्या लूकमध्ये दिसत आहे.  डोळ्यात मस्करा, मोठे केस, कपाळावर  सिंदूर आणि नाकात सुंदर नथ दागिणे घातल्याचे पाहायला मिळतंय. मिलिंदचा हा लूक खरोखर खूप कुतूहल निर्माण करणार आहे. मात्र, फोटो शेअर केल्यानंतर त्याने ट्विटमध्ये याविषयी फारशी माहिती दिली नाहीय.  

या प्रोजेक्टविषयी सगळी माहिती गुलदस्त्यातच असली तरीही नक्कीच धमाकेदार कम बॅक करण्याच्या तयारीत मिलिंद आहे हे मात्र नक्की. मोठ्या ब्रेकनंतर त्याला पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहणे नक्कीच मनोरंजनाची पर्वणी असणार हे मात्र नक्की.

ट्रोलरने ट्विंकल खन्नाचा फोटो एडिट करत लिहिले ‘ट्विंकल बॉम्ब’, अभिनेत्रीने अशी केली बोलती बंद

‘लक्ष्मी’ हा सिनेमा  डिजिटली रिलीज झाला. पण रिलीजआधीच या सिनेमावरून प्रचंड राडा झाला. चित्रपटाचे टायटल आणि कथेवरून लोकांनी या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी लावून धरली. अद्यापही हा वाद निवळलेला नाही. या वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारला ट्रोल केले जातेय. आता अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना ही सुद्धा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एका व्यक्तीले फोटोशॉप्डच्या मदतीने ट्विंकल खन्नाचा फोटो ‘लक्ष्मी’च्या पोस्टरवर फिट केला आणि त्याला ‘ट्विंकल बॉम्ब’ असे टायटल दिले. आता या फोटोवर लक्ष गेल्यावर ट्विंकल कुठे शांत राहणार होती. तिने हे मीम शेअर करत आपला संताप व्यक्त केला.

Web Title: Milind Soman Lady Look Viral On Social Media After Akshay kumar Laxmii Release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.