MeToo : tanushree dutta questions neha kakkar for working with anu malik in indian idol 11 | इतके होऊनही ती गप्प का? नेहा कक्करवर भडकली तनुश्री दत्ता  
इतके होऊनही ती गप्प का? नेहा कक्करवर भडकली तनुश्री दत्ता  

ठळक मुद्देलैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणा-या अनु मलिकला जज बनवल्याबद्दल तिने सोनी वाहिनीवरही आगपाखड केली.  

भारतात मीटू मोहिमेला वाचा फोडणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता ‘इंडियन आयडल11’ची जज नेहा कक्कर हिला लक्ष्य केले आहे.  ‘इंडियन आयडल11’च्या सेटवर नेहासोबत एका स्पर्धकाने गैरवर्तन केले. इतके होऊनही ती शांत कशी काय बसली? असा सवाल तिने केला आहे. केवळ इतकेच नाही तर अनेक महिलांनी अनु मलिक यांच्यावर महिलांनी गैरवर्तनाचे आरोप केलेले असताना नेहा त्यांच्यासोबत काम कशी काय करु शकते? असा सवालही तिने उपस्थित केला आहे.

 ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री नेहावर भडकलेली दिसली. याचवेळी अनु मलिकविरोधात मोर्चा उघडणारी सिंगर सोना मोहपात्रा हिची तिने पाठ थोपटली. ‘ सोना मोहोपात्रा आणि तिच्या सारख्याच निर्भीड आणि बेधडकपणे स्वत:च मत मांडणा-या महिलांसाठी मला उभे राहून टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. कारण त्या अनु मलिक यांना न घाबरता या सगळ्याला सामो-या गेल्या, असे तनुश्री म्हणाली. लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणा-या अनु मलिकला जज बनवल्याबद्दल तिने सोनी वाहिनीवरही आगपाखड केली.   सोनी सारखी वाहिनी अनु मलिक यांना त्यांच्या कार्यक्रमामध्ये परिक्षक म्हणून कसे काय निवडू शकते? हा मला पडलेला प्रश्न आहे. या व्यक्तीविरोधात अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाची तक्रार केली आहे. नैतिकतेपेक्षा कार्यक्रमाचा टीआरपी इतका महत्त्वाचा आहे का? असा प्रश्न तिने केला.

तनुश्रीने ‘इंडियन आयडल11’ च्या सेटवर नेहा कक्करसोबत जो प्रकार घडला त्यावरही मत मांडले. ‘इंडियन आयडल11’च्या सेटवर एका स्पर्धकाने चक्क नेहाला बळजबरीने किस केले. अशा घटना घडल्यावर नेमके कसे वाटते, याचा अनुभव नेहाने घेतला. मात्र ती तरीही शांत राहीली. अनु मलिकसोबत काम करतानाही तिने मौन बाळगले आणि आताही ती तेच करते आहे, असे ती म्हणाली.

Web Title: MeToo : tanushree dutta questions neha kakkar for working with anu malik in indian idol 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.