ठळक मुद्देप्रियंंका चोप्रासोबत ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणाऱ्या निकचा थाटही कमी नव्हता. यावेळी निकही एका डिझायनर सुटमध्ये दिसला.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचेमेट गाला 2019’मधील लूकचे फोटो पाहून भारतीय चाहते लोटपोट झालेत. या चाहत्यांनी प्रियंकाला प्रचंड ट्रोल केले. कुणी तिच्या केसांची तुलना वीरप्पनच्या मिशांशी केली, कुणी तिला विक्रम वेताळ म्हटले तर कुणी भूतनी. एकंदर काय तर प्रियंकाचा हा लूक पाहून सारेच जण चक्रावून गेले. तिच्या आऊटफिटचीही खिल्ली उडवली गेली. तिच्या या लूकपेक्षा, या लूकवरच्या मजेदार भन्नाट मीम्सनी लोकांचे अधिक मनोरंजन केले. पण प्रियंकाच्या ज्या आऊटफिटची खिल्ली उडवली गेली, त्याची किंमत तुम्हाला ठाऊक आहे?

सॉफ्ट पेस्टल गाऊनमध्ये प्रियंकाने पिंक कार्पेटवर एन्ट्री घेतली. या थाई हाय स्लिट गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते. या गाऊनमध्ये प्रियंका कमालीची सुंदर दिसत होती. पण या गाऊनसोबत प्रियंकाने कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रियंकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. ‘मेट गाला’च्या यंदाच्या थीमनुसार प्रियंकाचा हा लूक एकदम परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही.

प्रियंका चोप्राच्या या गाऊनची किंमत ही तब्बल 45 लाख रुपये एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच प्रियंकाने जे डायमंड इयरिंग घातले आहेत त्याची किंमतही सुमारे 10 लाख रुपये एवढी आहे.


प्रियंंका चोप्रासोबत ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणाऱ्या निकचा थाटही कमी नव्हता. यावेळी निकही एका डिझायनर सुटमध्ये दिसला. डायमंडसारखा चमकदार शर्ट आणि मॅचिंग शूज त्याने कॅरी केले होते. पण या सर्वात खास होते ते म्हणजे निकच्या मनगटावरचे घड्याळ. 38 कॅरेट हिऱ्यांनी मढवलेल्या या घड्याळाला व्हाइट गोल्डन प्लेट केले होते. या घड्याळाची भारतीय किंमत जवळपास 20 लाखांपेक्षा अधिक आहे.


Web Title: Met Gala 2019: Priyanka Chopra's gown price
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.