Meera Rajput Troll Due to this Short Skirt | मिनी स्कर्टमुळे ट्रोल झाली मीरा राजपूत, नेटीझन्स म्हणाले.......
मिनी स्कर्टमुळे ट्रोल झाली मीरा राजपूत, नेटीझन्स म्हणाले.......

शाहिदकपूरची पत्नी मीरा राजपूतवर दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. विशेष म्हणजे मीरा काहीही न करता  सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. ब-याचदासोशल मीडियावर सेलिब्रेटीमंडळी त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे ब-याचदा नेटीझन्सकडून ट्रोल होत असतात.  अगदी त्याचप्रमाणे मीरा राजपूतवर नेटीझन्सने निशाणा साधला आहे. 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये मीराने पांढ-या रंगाच्या शर्टवर पिवळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. मीरा या ड्रेसमध्ये सुंदर दिसत असली तरी नेटीझन्सना मात्र तिचा हा अंदाज आवडलेला दिसत नाही. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रीया उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. मीराने शॉर्ट स्कर्ट घातल्यामुळे तिची खिल्ली उडवली जात आहे. फोटोमध्ये मीरासोबत तिची मुलगीही दिसत आहे. त्यामुळे नेटीझन्सने मीराला ''तु तुझ्या मुलीचे कपडे घातले आहेस का?'' '' इतके पैसे कमवतायेत जरा कपड्यांवर पण पैसे खर्च करा'' अशा प्रकारच्या खिल्ली उडवणा-या अनेक कमेंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


विशेष म्हणजे बॉलिवूडच्या अनेक लीडिंग लेडिजप्रमाणेच मीरा राजपूतही फिटनेस फ्रीक आहे. अनेकदा मीरा जिममध्ये जातानाही स्पॉट करण्यात आलं आहे. मीरा आपला जिम लूक, फॅशनेबल कपड्यांव्यतिरिक्त महागड्या एक्सेसरीजमुळेही ओळखली जाते. 

Web Title: Meera Rajput Troll Due to this Short Skirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.