झीनत अमान यांना हवा होता घटस्फोट, पण त्याआधीच झाला पतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 01:33 PM2019-09-16T13:33:36+5:302019-09-16T13:37:27+5:30

बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांचे पती आणि अभिनेते मजहर खान यांचे 1998 मध्ये आजच्याच दिवशी निधन झाले होते.

mazhar khan death anniversary he used to beat zeenat aman badly |  झीनत अमान यांना हवा होता घटस्फोट, पण त्याआधीच झाला पतीचा मृत्यू

 झीनत अमान यांना हवा होता घटस्फोट, पण त्याआधीच झाला पतीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देदोन मुले आणि पत्नी असताना मजहर यांनी रूबिना मुमताजसोबत दुसरे लग्न केले.

बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांचे पती आणि अभिनेते मजहर खान यांचे  1998 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 16 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले होते. 1985 मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्यासोबत लग्न केले. पण झीनत आणि मजहर यांचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते.
1979 मध्ये प्रदर्शित ‘संपर्क’ या चित्रपटातून मजहर खान यांनी डेब्यू केला होता. अनेक चित्रपट करूनही मजहर यांना म्हणावे तसे यश मिळत नव्हते. याचदरम्यान मजहर आणि झीनत एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्न केले. पण लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांमध्येही वाद होऊ लागलेत. असे म्हणतात की, मजहर झीनत यांना मारहाण करायचे.

एका मुलाखतीत झीनत यांनी मजहर यांच्याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मजहरला भेटल्यानंतर खरे प्रेम मिळाल्याचे मला वाटते होते. याचमुळे मी मजहरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईचा या नात्याला विरोध होता. पण तरीही मी मजहरसोबत लग्न केले.

मजहरमध्ये खरे तर ती क्वालिटी नव्हती. पण तरीही मी त्याला लाईफ पार्टनर म्हणून निवडले. कारण मला त्याच्या डोळ्यांत खरे प्रेम दिसले होते. मी लग्न केले. पण लग्नानंतर मी घरात राहून मुलांचा सांभाळ करावा, असे मजहरला वाटे. लग्नानंतर एकाच वर्षांत हे लग्न करून मी खूप मोठी चूक केल्याची जाणीव मला झाली होती. याऊपर हे लग्न टिकावे म्हणून मी खूप प्रयत्न केलेत.’ 

दोन मुले आणि पत्नी असताना मजहर यांनी रूबिना मुमताजसोबत दुसरे लग्न केले. ही गोष्ट झीनत यांच्या जिव्हारी लागली आणि झीनत यांनी मजहर यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत मजहर किडनीच्या आजाराने अंथरूणाला खिळले होते. घटस्फोट होण्याआधीच मजहर यांचे निधन झाले.
मजहर यांनी आंधी-तूफान, गुलामी, शिवा का इंसाफ, बिंदिया चमकेंगी, धरम और कानून, एक ही भूल अशा अनेक चित्रपटांत काम केले.

Web Title: mazhar khan death anniversary he used to beat zeenat aman badly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.