मासूममधील हा कलाकार आता बनलाय अभिनेता, दिलाय हिट चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 04:16 PM2019-10-26T16:16:19+5:302019-10-26T16:18:59+5:30

मासूम या चित्रपटातील छोटा बच्चा जान के... गाणे तुम्हाला आठवतेय का? हे गाणे त्या काळात चांगलेच गाजले होते. तसेच या गाण्यात असलेला चिमुरडा देखील प्रेक्षकांना भावला होता.

Masoom fame omkar kapoor worked in pyaar ka punchnama 2 | मासूममधील हा कलाकार आता बनलाय अभिनेता, दिलाय हिट चित्रपट

मासूममधील हा कलाकार आता बनलाय अभिनेता, दिलाय हिट चित्रपट

googlenewsNext
ठळक मुद्देओमकारचा प्यार का पंचनामा 2 हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.

बॉलिवूडमध्ये अनेक बालकलाकार आपल्याला पाहायला मिळतात. या बालकलाकारांना प्रेक्षकांची चांगली पसंती देखील मिळते. पण अनेकवेळा काही कालावधीनंतर लोक त्यांना विसरून जातात तर काही बालकलाकार मोठे झाल्यानंतर चित्रपटात नायक-नायिका म्हणून एंट्री करतात आणि बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बालकलाकाराविषयी सांगणार आहोत.

मासूम या चित्रपटातील छोटा बच्चा जान के... गाणे तुम्हाला आठवतेय का? हे गाणे त्या काळात चांगलेच गाजले होते. तसेच या गाण्यात असलेला चिमुरडा देखील प्रेक्षकांना भावला होता. या चित्रपटात ओमकार कपूरला आपल्याला बालकलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. ओमकारने मासूम प्रमाणेच चाहत, हिरो नं. 1, जुडवा, जुदाई, मेला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो आता कसा दिसतो तुम्हाला माहीत आहे का? या कलाकाराने काही वर्षांपूर्वी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आहे आणि त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता.

ओमकारचा प्यार का पंचनामा 2 हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्याने यू मी और घर आणि झुठा कही का यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. झुठा कही का हा चित्रपट याच वर्षांत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याला ऋषी कपूर, जिमी शेरगिल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

 

Web Title: Masoom fame omkar kapoor worked in pyaar ka punchnama 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.