सोनू निगम-भुषण कुमार यांच्या वादामुळे मरीना कुंवरच्या नावाची होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहे ही भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 02:12 PM2020-06-23T14:12:34+5:302020-06-23T14:13:04+5:30

गायक सोनू निगमने नुकताच एक व्हिडिओ शेअर करुन टी- सीरिजचे मालक भूषण कुमारवर निशाणा साधला होता. या व्हिडीओ नंतर सर्वत्र मरीना कुंवर हे नाव चर्चेत आहे.

Marina Kunwar's name is being discussed due to Sonu Nigam-Bhushan Kumar dispute, find out what's wrong | सोनू निगम-भुषण कुमार यांच्या वादामुळे मरीना कुंवरच्या नावाची होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहे ही भानगड

सोनू निगम-भुषण कुमार यांच्या वादामुळे मरीना कुंवरच्या नावाची होतेय चर्चा, जाणून घ्या काय आहे ही भानगड

googlenewsNext

गायक सोनू निगमने नुकताच एक व्हिडिओ शेअर करुन टी- सीरिजचे मालक भूषण कुमारवर निशाणा साधला होता. सोनू निगमने भूषण कुमारवर टीका करणारा व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता. सोनूच्या या व्हिडिओनंतर मरीना कुंवर या नावाची सगळीकडे चर्चा होऊ लागली. जाणून घेऊयात कोण आहे ही मरीना कुंवर

गायक सोनू निगमने टीसीरिज कंपनीचे मालक भूषण कुमारवर निशाणा साधत सोशल मीडियावर एक व्हि़डिओ शेअर केला होता. त्यात सोनूने भूषण कुमारला ' माझ्या नादी लागलास तर, मरीना कुंवरचा व्हिडिओ युट्यूबवर पब्लिश करेन आणि मग त्याचे पुढे काय होते ते तू बघून घे' अशा शब्दात धमकी दिली होती.

या व्हिडीओ नंतर सर्वत्र मरीना कुंवर हे नाव चर्चेत आहे. मरीना कुंवर ही एक मॉडेल आणि टिव्ही अभिनेत्री आहे. मरीनाने 'जिंदगी तुमसे', 'जग्‍गू दादा', 'शपथ', 'सीआईडी' आणि 'आहट' या मालिकांमध्ये काम केले आहे.


2018 मध्ये मरीना कुंवरने दिग्दर्शक साजिद खान आणि भूषण कुमार याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. भूषणने मला व्हिडिओमध्ये काम देण्याची ऑफर देत घरी बोलावले होते आणि माझ्याबरोबर गैरवर्तन केले होते, असे मरीनाने या मुलाखतीत सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर सोनूने भूषण कुमारला धमकावले आहे.


याशिवाय मरीनाचे नाव मयूर वर्मा या टीव्ही स्टारला डेट करत असताना सुद्धा चर्चेत आले होते. 2016 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. 2017 मध्ये मरीनाची अक्षय कुमार सोबत मिलियन डॉलर बेबी या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी निवड करण्यात आली होती.

Web Title: Marina Kunwar's name is being discussed due to Sonu Nigam-Bhushan Kumar dispute, find out what's wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.