तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिलाय लीप लॉक, लॉकडाऊनमुळे होऊ शकला नाहीये चित्रपट प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:00 AM2020-06-09T08:00:00+5:302020-06-09T08:00:02+5:30

'बबलू बॅचलर' या चित्रपटात तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन असून चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यावर याच सीनची चर्चा रंगली होती.

marathi actress Tejashree Pradhan and sharman joshi lip lock scene in babloo bachelor | तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिलाय लीप लॉक, लॉकडाऊनमुळे होऊ शकला नाहीये चित्रपट प्रदर्शित

तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिलाय लीप लॉक, लॉकडाऊनमुळे होऊ शकला नाहीये चित्रपट प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्दे'बबलू बॅचलर' या चित्रपटाचा ट्रेलर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण या ट्रेलरमध्ये चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळाला होता

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात सगळीकडे लॉकडाऊन आहे. सध्या लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले असले तरी चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याची अद्याप सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अनेक चित्रपटांची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे तर काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आहेत. बबलू बॅचलर हा चित्रपट २० मार्चला प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची लाडकी तेजश्री प्रधान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, तेजश्रीने तिच्या या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटात लीप लॉक सीन दिला आहे.

बबलू बॅचलर या चित्रपटात शर्मन जोशी आणि तेजश्री यांची जोडी जमली असून त्यांनी याआधी एका नाटकात काम केले होते. या नाटकाला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

'बबलू बॅचलर' या चित्रपटाचा ट्रेलर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण या ट्रेलरमध्ये चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळाला होता. पहिल्याच चित्रपटात तेजश्रीने किसिंग सीन दिल्याने याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला तिने काही काळासाठी रामराम ठोकला होता. ती आता 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. पण सध्या लॉकडाऊनमुळे या मालिकेचे चित्रीकरण होत नाहीये.

Web Title: marathi actress Tejashree Pradhan and sharman joshi lip lock scene in babloo bachelor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.